पुणे : पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या मालकीच्या अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (ABIL) चार कोटी रुपये किंमतीच्या जमिनीवर ईडीने तात्पुरती टाच आणली आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी (Prevention of Money Laundering Act,2002) ईडीने ही कारवाई केली आहे. जप्ती आणलेल्या जमिनीवर भोसलेंच्या मालकीच्या ABIL कंपनीचे कार्पोरेट ऑफिस आहे.
नोकरशहांच्या घरांच्या बांधकामासाठी आरक्षित भूखंडावर भोसले यांनी व्यावसायिक इमारत बांधली. या बांधकाम व्यवहाराची ईडी चौकशी करीत आहे. भोसलेची रिअल इस्टेट कंपनी ‘एबीआयएल’ विरुद्ध पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरवर ईडीचा खटला आधारित आहे. भोसले यांनी नियमावलीत फेरफार करून भूखंड ताब्यात घेण्यास व्यवस्थापित केले आणि नंतर त्या भूखंडावर व्यावसायिक संकुल बांधल्याचा आरोप आहे.
अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणात पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता. शोध घेतल्यानंतर अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले यांनी ईडीच्या कारवाईविरोधात कोर्टाकडे धाव घेतली असून कोर्टाचा निर्णय अद्याप बाकी आहे.
या आधी ईडीने भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची परदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा 1999. (FEMA) अंतर्गत स्वतंत्र चौकशीत सुमारे 40 कोटींची संपत्ती जप्त केली होती. भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी फेमाच्या उल्लंघन करत दुबईत मालमत्ता संपादन केल्याचे एजन्सीला आढळलं होतं.
पहा व्हिडीओ : Pune Money Laundering : बांधकाम व्यवसायिक Avinash Bhonsale यांची 4 कोटींची संपत्ती ED कडून जप्त
महत्वाच्या बातम्या :