अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न झालेच नाहीत, तिला आधी गोळ्या झाडून ठार मारण्यात आले आणि त्यानंतर तिच्या शरीरावर डार्ट मारण्यात आला, असं संबंधित व्यक्ती आपापसात बोलत आहेत.
वन विभागाने अवनीला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केल्यानंतर तिने वन विभागाच्या बचाव पथकावर हल्ला केल्यामुळे तिला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात होतं. या कथित ऑडिओ क्लिपिमध्ये मात्र वाघिणीला थेट गोळ्या घातल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आधीच संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले 'ऑपरेशन टी वन' आणखी वादात सापडतं की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
वन्य कायद्यानुसार एखादा वन्य प्राणी जर हिंसक बनत असेल तर त्याला बेशुद्ध करुन पकडणं, असा नियम आहे. मात्र अवनी वाघिणीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार मारण्यात आलं, असा आरोप केला जात आहे.
ऐका ऑडिओ क्लिप: