मुंबई : राज्यात हळूहळू हातपाय पसरणाऱ्या कोरोनाचं शिवजयंतीच्या कार्यक्रमांना ग्रहण लागलंय. आज औरंगाबादेत होणारे शिवसेना आणि मनसेच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र असं असलं तरी आज शिवजयंतीचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलाय. यासाठी राज ठाकरे औरंगाबादेत दाखलही झालेत. आज सकाळी क्रांती चौकातल्या शिवरायांच्या पुतळ्याला राज ठाकरे अभिवादन करणार आहेत. तर, शिवसेनेक़डूनही आज औरंगाबादेतल्या सर्व शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल.


कोरोनामुळे शिवसेनेकडून मुंबईतील काही शिवजयंतीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच, आज मुंबई विमानतळावर होणारा शिवजयंतीचा कार्यक्रमही रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता शिवसेनेने शिवजयंतीनिमित्त मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐवजी चौकाचौकांमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून उद्या करणार आहे. शिवसेना दरवर्षी तिथीनुसार शिवजयंती साजरी करते मात्र उद्या शिवजयंती त्यादरम्यान कुठलेही मिरवणूक काढण्यात येणार नसल्यासचे शिवसेना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे .


Raj Thackeray on Shiv Jayanti | शिवजयंतीला परवानगी का नाही?; निवडणुका पुढे ढकलणार का? : राज ठाकरे




काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी करुन शिवसेनेनं हिंदुत्त्वाशी तडजोड केल्याचा आरोप होत असताना, हातात भगवा धरणाऱ्या मनसेकडून ती पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच आता तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी मनसे पुढे सरसावल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


तर नेहमीप्रमाणे शिवसेना यंदाही 12 मार्चला शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं होतं. शिवाय आता आयरेगैरे सुद्धा तिथीनुसार शिवजयंती साजरी करत असल्याचा टोला दानवे यांनी नाव न घेता मनसेला लगावला आहे. तरी, ते इतके दिवस कुठे होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे. 19 फेब्रुवारीला मुख्यमंत्री या नात्याने 27 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांनी शिवनेरी गडावर जाऊन शिवजयंती साजरी केली होती.


संबंधित बातम्या :


मनसे तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार, शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न