CM Eknath Shinde visits Aurangabad: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर (Aurangabad News) आहेत. याच दौऱ्यात मुख्यमंत्री हे रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या पैठण मतदारसंघात हजेरी लावणार आहे. दरम्यान ज्या बिडकीन गावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसंवाद यात्रा काढली होती, त्याच बिडकीन गावात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा रॅली निघणार आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच आदित्य ठाकरे दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भुमरे यांच्या मतदारसंघातील बिडकीन गावात शिव संवाद रॅली काढली होती. तसेच बिडकीनच्या बस स्टँडवर सभा ही घेतली होती. आता त्याच बिडकीन गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा रॅली निघाली आहे. तर ज्या ठिकाणाहून आदित्य ठाकरेंची रॅली निघाली होती, त्याच ठिकाणाहून शिंदे यांची रॅली निघाली आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणावरच मुख्यमंत्री शिंदे यांची पेढे तुळा करण्यात येत आहे.


आदित्य ठाकरेंच्या रॅलीला झाली होती गर्दी...


एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे पैठण मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तर बिडकीनमध्ये निघालेल्या रॅलीत सुध्दा मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पैठण मतदारसंघात असून, त्यांच्या या दौऱ्याची मोठी चर्चा आहे.


असा आहे मुख्यमंत्री यांचा दौरा....


पैठण तालुक्यातील चितेगाव येथे क्रेनने हार घालून स्वागत.
पैठण रोडवरील पांगारा फाट्यावर क्रेनने हार घालून स्वागत.
पैठण रोडवरील फारोला येथे स्वागत आणि पेढा तोळा करण्यात येणार.
पैठण रोडवरील बिडकीन येथे निलजगाव फाट्यावर क्रेनने हार घालून स्वागत आणि रॅलीला सुरवात.


बिडकीन बस स्टँडला स्वागत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पेढा तोळा करण्यात येणार. सोबतच संदिपान भुमरे यांची लाडू तोळा होणार.


पैठण रोडववरील कवडगाव येथे क्रेनने हार घालून स्वागत


पैठण रोडवरील ढोरकीन गावात क्रेनने हार घालून स्वागत.


पुढे पिपळवाडी गावात मुख्यमंत्री यांचे स्वागत.


पैठणच्या अलीकडे असलेल्या पावनगणपती मंदिरात मुख्यमंत्री दर्शन घेणार.


पैठणच्या मुख्य सह्याद्री चौकातून मोटरसायकल रॅली काढली जाणार.


छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण. 


पक्षाच्या जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ: कावसानकर स्टेडियम, पैठण) 


पैठण येथून मोटारीने आपेगाव ता. पैठणकडे प्रयाण. 


आपेगाव येथे क्रेनने हार घालून स्वागत आणि संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरास भेट व दर्शन 


आपेगाव, ता.पैठण येथून मोटारीने पाचोड ता. पैठणकडे प्रयाण. 


पाचोड येथे जंगी स्वागत करण्यात येणार.


संदिपान भुमरे, मंत्री, रोहयो आणि फलोत्पादन यांच्या निवासस्थानी आगमन व राखीव 


पाचोड ता.पैठण येथून मोटारीने आडूळ मार्गे चिकलठाणा विमानतळावर दाखल.


इतर महत्वाच्या बातम्या



Cabinet Meeting: सणासुदीच्या सुट्ट्यांनंतर बऱ्याच दिवसांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; या महत्वाच्या निर्णयाची शक्यता