Aurangabad News : अनेकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे परिस्थिती हाताळताना पोलिसांना बऱ्याचदा अडचणीचा सामना करावा लागतो. तसेच दंगली किंवा हिंसाचाराच्या घटना घडल्यावर घटनास्थळावरून एकाचवेळी अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांना फोनवरून माहिती देणं शक्य होत नाही. त्यामुळे यावर आता औरंगाबाद (Aurangabad) शहरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पर्याय शोधून काढले आहे. कारण, एका टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून संपूर्ण यंत्रणेला माहिती देता येणार आहे.


शहरात कोठेही कायद्याची पायमल्ली होत असेल तर एका टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून संपूर्ण यंत्रणेला माहिती देता येणार आहे. एकाच वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करता येईल. शिवाय यामुळे तातडीने यंत्रणा मदतीला धावून येणार आहे. औरंगाबाद शहर पोलिसांनी हे हायटेक पाऊल टाकत नागरी सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. तर, या यंत्रणेमुळे गुन्हेगारीला आळा बसणार आहे.


या क्रमांकावर साधावे लागणार संपर्क 


शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यावर नागरी सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री क्रमांक 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याचा आवाज कॉल स्वरूपात शहरातील सर्व तीन हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ऐकविला जाणार आहे. तसेच एखाद्या घटनेची माहिती एकाचवेळी या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देता येणार आहे. 


सीपींनी दाखविले प्रात्यक्षिक! 


दरम्यान औरंगाबादचे सीपी मनोज लोहिया यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. यावेळी सीपी यांनी आपल्या फोनवरून संबंधित टोल फ्री नंबरवरून फोन केला. त्यानंतर एक महत्वाची सूचना त्यांनी त्या ॲपवरून पोलीस कर्मचाऱ्यांना दिली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन मिनटांच्या आता या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा फोन वाजू लागला. तसेच या कर्मचाऱ्यांनी फोन उचलताच त्यांना सीपी यांनी पाठवलेला ऑडिओ मॅसेज ऐकू आला. त्यामुळे दोन मिनटात एकाचवेळी अनेकांना महत्वाची माहिती देणं सोपं झालं आहे. 


दंगल झाल्यावर होणार फायदा...


औरंगाबाद शहर नेहमीच संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवथेचा प्रश्न निर्माण होत असतो. तसेच एखांदी घटना घडली तर पोलीस आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा घटना घडलेल्या भागातील पोलिसांना एखादा संदेश द्यायचा असल्यास त्या अधिकाऱ्यांना फोन करण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे हा वेळ वाचवा किंवा रिस्पॉन्स टाईम कमी व्हावा यासाठी औरंगाबाद शहर पोलीस दलाचे आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून  ही ॲप तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दंगल झाल्यावर किंवा एखांदी मोठी घटना घडल्यास या ॲपचा मोठा फायदा होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Crime News : मराठवाड्यात गावठी कट्टे येतायत कुठून, एकामागून एक गोळीबाराच्या घटना; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण