Aurangabad Latest News:  भाजप दिलेला शब्द पाळतो, नितीश कुमार यांना दिलेला शब्द पाळला, आता सांगा कोण खोटं कोण बोलतेय? असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ते औरंगाबाद येथे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझ्यावर विश्वास ठेऊन आलेल्यामधील एकजणही म्हणाला नाही की, मी ईडीच्या धाकामुळे आलोय. आमच्या मर्जीने आलोय. आम्ही अन्यायाविरोधात लढण्यासाठी आलोय. शिवसेनेला वाचवण्यासाठी आलोय. ईडीच्या धाकाने, कोणत्याही तपास यंत्रणाच्या धाकानं कुणी येत असेल तर मला नकोय. .


महाराष्ट्रात साडे सात हजार पोलिसांची भरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली आहे.  औरंगाबाद येथे टीव्ही सेंटर भागातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करताना मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. तरुणांनी पोलीस भरती करण्याची घोषणाबाजी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ घोषणा केली. 


जोरदार शक्तीप्रदर्शन...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अब्दुल सत्तार यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. सिल्लोड शहरातील प्रत्येक मुख्य चौकात होर्डिंगबाजी करण्यात आली होती. तसेच ठीक-ठिकाणी जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली आहे. आमदार सत्तार हे मंत्रीमंडळाच्या शर्यतीत असून, त्यामुळे त्यांच्याकडून मुख्यमंत्री यांच्यासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा पाहायला मिळाली. 


भुमरे, शिरसाट यांच्या कार्यालयालाही भेट...
बोरनारे आणि सत्तार यांच्या मतदारसंघातील भेटीनंतर मुख्यमंत्री हे आमदार संदिपान भुमरे, संजय शिरसाट आणि प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयाला सुद्धा भेट देणार आहे. यासाठी तिन्ही आमदारांकडून कार्यकर्त्यांची मोठी जमवा-जमवी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याची  कोणतेही कसर राहणार नाही, याची खबरदारी बंडखोर आमदारांकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या औरंगाबाद दौऱ्यातील शक्तिप्रदर्शनाची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. 


वाहतुकीतीत बदल...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी शहरातील वेगवेगळ्या भागातील कार्यक्रमाना हजेरी लावणार आहे. आज रविवार असल्याने लोकांची रस्त्यावर गर्दीही जास्त असते. मात्र पोलिसांनी वाहतुकीतीत बदल केल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावी लागणार असण्याची शक्यता आहे. तर अनेक मार्गात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांकडून परिस्थिती हाताळण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.