Sanjay Raut Detained : संजय राऊत यांच्या घरी सापडलेल्या साडे अकरा लाख रुपयांचा हिशेब लागला आहे. त्यापैकी दहा लाख पक्षाचे आहे. त्या दहा लाखांवर एकनाथ शिंदे अयोध्या असा उलेलख आहे. तर उरलेले दीड लाख रुपये घरातले असून घर कामासाठी ठेवलेले होते. या पैश्यांची नोंद आणि त्यावर लिहिलेले याची नोंद ED ने घेतली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्या घरातून 11.50 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या संजय राऊत हे ईडी कार्यालयात उपस्थित आहेत. त्यांची चौकशी देखील सुरू आहे. यावेळी या साडेअकरा लाख रुपयांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. 
 
ज्या वेळी ईडीची रेड सुरु होती. त्यावेळी संजय राऊत यांच्या घरातील व्यक्ती तिथे उपस्थित होते. त्यापैकी एकाला पैशांबाबात विचारलं असता, त्यांनी याबाबत दुजोरा दिला.  हे पैसे कुठून आले अन् तुमच्या घरी सापडले का? असं विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे असणाऱ्या साडेअकरा लाखांमधील दहा लाख रुपये हे पक्षाचे होते. त्यावर अयोध्या एकनाथ शिंदे असं नाव लिहिलेलं होतं. ते दहा लाख ईडीला मिळालेले आहेत. त्यांनी ते जप्त केलेले आहेत.  तर इतर दीड लाख हे घरच्या कामांसाठी आणलेले होते. या संदर्भात ईडी अधिक चौकशी करणार आहे. 


संजय राऊत यांच्या घरी मिळालेले साडे अकरा लाख रुपये, कुठून आले? कसे आले? याची चौकशी ईडी करत आहे. त्यातून काही निष्पण्ण होतेय का? ते ईडीकडून तपासलं जाईल. यासंदर्भातील चौकशी सुरु आहे. या पैशांचा हिशेब न देता आल्यामुळेच संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान, ईडी छापेमारीत त्यांच्या घरातून काही कागदपत्रे देखील जप्त करण्यात आले आहेत. जर ही रोकड टॅली झाली तर, ही रक्कम पुन्हा राऊत यांना परत केली जाणार असल्याचं ईडीकडून सांगण्यात येत आहे. तसेच ही रक्कम टॅली झाली नाही तर या संदर्भात देखील त्यांची चौकशी केली जाईल. 


नऊ तासांत काय झाले?
रविवारी सकाळी सात वाजता दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील संजय राऊत यांच्या फ्लॅटमध्ये ईडीचे अधिकारी दाखल झाले. 


सकाळी 7.15 वाजता ईडीचे पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झाले. यावेळी संजय   राऊत आणि त्यांचे बंधू सुनिल राऊत घरीच होते. 




 



सकाळी 8.20 वाजता सुनिल राऊत खिडकीत आले. 


सकाळी 8.40 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते संजयर राऊतांच्या घराबाहेर जमले आणि राऊतांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. 


सकाळी 8.46 ते 8.50 दरम्यान राऊतांचे चार ट्विट, शिवसेना सोडणार नाही, कोणत्याही घोटाळ्याशी काडीमात्र संबंध नाही, खोटी कारवाई, खोटे पुरावे, मी शिवसेना सोडणार नाही असे चार ट्विट संजय राऊत यांकी केले.  


सकाळी नऊ वाजता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांची प्रतिक्रीया आली. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली, राऊतांच्या आजच अटकेची शक्यता, शिरसाठ यांची प्रतिक्रीया. 


सकाळी 9.30 वाजता संजय राऊतांच्या घरी डीसीपी प्रशांत कदम सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी पोहोचले. 


सकाळी 10.28 वाजता संजय राऊतांचे वकील विक्रांत साबणे पोहोचले. 


सकाळी 11.07 वाजता स्वत: संजय राऊत घराच्या खिडकीत आले आणि कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. 


सकाळी 11.25 वाजता आढावा बैठकीसाठी जाताना मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या कारवाईवर पहिली प्रतिक्रीया दिली. 


दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. कर नाही तर डर कशाला अशी राऊतांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. 


दुपारी 1.30 वाजता राजन विचारे दहा बसेस भरून ठाण्यातील शिवसैनिकांना घेऊन मातोश्रीवर दाखल झाले. 


दुपारी साडेतीन वाजता संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची ईडीकडून तयारी


दुपारी 3.50 वाजाता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले.