औरंगाबाद : कोरोनाचा उद्रेक कमी करण्यासाठी लसीकरण एकमेव शस्त्र सद्या जगासमोर उपलब्ध आहे.  हेच शास्त्र वापरत औरंगाबादच्या जानेफळ गावानं 45 वर्षांवरील गावातील शंभर टक्के लसीकरण करून घेतले आहे. पंचेचाळीस वर्षांवरील व्यक्तींचं 100% लसीकरण करणारे महाराष्ट्रातील बहुधा हे पहिलेच गाव असावं. या गावचा हा आदर्श इतरांनीही घेतला तर कोरोनाला हद्द पार करण्यासाठी नक्कीच मदत होईल.


औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील हे जानेफळ गाव. फुलंब्री खुलताबाद रोडवर 10 ते 12 किमी गेल्यावर जानेफळ गाव लागतं. गावची लोकसंख्या जेमतेम  525. या छोट्याशा गावांनं कोविडच्या संकटाच्या काळाला एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या गावातील 45 वर्षावरील व्यक्तींचे 100 टक्के लसीकरण करून घेतले आहे. तेही गावात एकही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नसतांना हे विशेष.


गावातील लोक सुरवातीला लस घेण्यासाठी  लोकांच्या मनात भीती होती. काही लोक कोरोना झालाच नाही तर लस का घ्यावी,मला काही होत नाही. असे अनेक प्रश्न उपस्थित करत पण प्रत्येक प्रश्नच उत्तर देत गावकऱ्यांची लसीकरण बाबत एकवाक्यता झाली. गावात सुरवातीला सगळ्यांची अँटीजन टेस्ट केली आणि नंतर लसीकरण. विशेष म्हणजे लस घेण्यासाठी गावातील महिला अग्रेसर होत्या. गावातील निर्मला जाधव  आणि शशिकालाबाई खिल्लारे मोठ्या अभिमानाने सांगतात लस घेतली शेतात गेले काम केलं घर काम केलं काहीही झालं नाही आज लस घेतली तरच समाधान नाही वाटतं की कोरोना झालाच तर मला काही होणार नाही. 


लसीकरणच नाही तर गावात कोरोनाचे सर्व नियम पाळले जातात. गावातील कोणताच व्यक्ती विना मास्क बाहेर घराबाहेर पडत नाही. त्यामुळे आजपर्यंत महाभयंकर ठरलेल्या कोरोनाला सुद्धा या गावात एन्ट्री करता आली नाही. गावात 45 वर्षांवरील 80 लोक आहेत. गावकऱ्यांनी गावात एक बैठक बोलावली. त्यात लसीकरण करण्यावर एक विचार झाला. गावात सरपंच अंगणवाडी वर्कर , आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी गावात फेरी काढली. लोकांना लसीकरणाच महत्व सांगितले. गणोरी रुग्णालयायाने ही प्रतिसाद देत गावात लसीकरणाचा कॅम्प लावला.


सरलाबाई झाल्टे अंगणवाडी सेविका घराघरात गेल्या लसीकरणाचे महत्त्व सांगितलं. स्वतः लस घेतली, लोकांना त्याचे फायदे सांगितले. मग हळूहळू लोक लस घ्यायला तयार झाले. कृष्णा गावंडे या सरपंच आणि ही लसीकरणासाठी मोठी मेहनत घेतली सुरुवातीला गावात लसीकरणाचा के मिळत नव्हता नंतर लसीकरण करण्यासाठी कॅम्प मिळाला तर गावकरी तयार नव्हते त्यांचे मनोबल वाढवले गावातील एका डॉक्टरांना गावात बोलून लसीकरणाचे महत्त्व सांगायला सांगितलं तेव्हा गावकरी तयार आज 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींचे लसीकरण झालं आहे.


या गावकऱ्यांनी केवळ आपल्या गावात नाही तर आजूबाजूच्या काही खेड्यातील लोकांना देखील एकत्र करून ही लस दिली आहे .त्यामुळे या गावकऱ्यांचा आदर्श इतर गावांनी घेणे गरजेचे आहे. तरच गावागावातून नव्हे तर देशातूनही हद्दपार होईल. मंडळी हल्ली कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की दिवसात एखादं दुसरा फोन येतो की आपल्या ओळखीचा नातलग कोरोनामुळे मृत्यूमुखी पडला आहे .या सगळ्या नकारात्मक वातावरणात औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील जनेफळ गावात एकही व्यक्ती पॉझिटिव्ह नसताना पॉझिटिव्ह विचार करून 45 वर्षावरील सगळ्या व्यक्तींचे लसीकरण केले. या गावच्या सकारात्मक विचारांचा आदर्शच कोरोनामुक्ती कडे घेऊन जाणार आहे.