औरंगाबाद : लग्नसोहळ्यात कपडे, सजावट, जेवण यावर भारंभार खर्च करण्यावर अनेकांचा कल असतो. मात्र औरंगाबादमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. श्रेया मुनोत या तरुणीने लग्नखर्च टाळून 90 गरीबांना घरांचं वाटप केलं आहे.
कुठलीही छानशौकी न करता अत्यंत साध्या पदधतीनं श्रेयाचं लग्न पार पडत आहे. मात्र या लग्नात ती गरीबांना तब्बल 90 घर देणार आहे. विवाह सोहळ्यानंतर गरीबांना चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे.
लग्नात अवाजवी खर्च करण्यापेक्षा श्रेयाला लग्नाच्या निमित्तानं समाजाला मदत करायची इच्छा होती. त्यानंतर काकांच्या संकल्पनेतून तिचं हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं. त्यासाठी दीड कोटींचा खर्च करुन दोन महिन्यांत ही घरं बांधण्यात आली. कौतुकास्पद म्हणजे तिच्या या निर्णयाला आई-वडील आणि भावी नवऱ्यानेही तिला साथ दिली.