औरंगाबाद : परीक्षेत कॉपी करताना पकडल्यामुळे केंद्रप्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादमध्ये इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.
विद्यार्थ्यांच्या मारहाणीत केंद्रप्रमुख डॉ. सुनील पिंपळे यांच्या पायाला दुखापत झाली आहे. इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या गिरीश चौधरी याच्यासह चार जणांवर हर्सूल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंजिनियरिंगच्या परीक्षेत कॉपी करताना पकडल्याचा राग विद्यार्थ्यांच्या मनात होता. त्याच रागातून रविवारी रात्री हर्सूल परिसरात केंद्रप्रमुखांची गाडी अडवून विद्यार्थ्यांवर मारहाण केल्याची माहिती आहे.