पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसीटी) चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ.करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक सुरेश भोसले, सुरक्षारक्षक भुरसिंग अजितसिंग राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आकाश भीमराव भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, आकाश भोसले हे विद्यापीठातील मराठी विभागामध्ये एमफील करीत आहे. विद्यापीठातील विविध प्रश्नावर त्यांनी आवाज उठविला आहे. कुलगुरु, कुलसचिव यांच्यासह पाच जणांना भोसले हे अनुसूचित जाती आणि जमातीमधील असल्याचे माहित असल्याने सदर पाच जणांनी जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्यासाठी जातीय द्वेषातून विद्यापीठाच्या एका प्रकरणात एक एप्रिल 2019 रोजी त्यांच्याविरुद्ध खोटे आणि गंभीर गुन्हे दाखल केले.
एक एप्रिल रोजी विद्यापीठाने जेवणाच्या प्रश्नावरुन अचानक काढलेल्या एका परिपत्रकाबद्दल विद्यापीठातील रिफेक्टरीसमोर सकाळी 11 ते दुपारी दोन या वेळेत 150 ते 200 विद्यार्थी गोंधळ घालत होते. त्यावेळी भोसले हे त्यांच्या वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करत होते. हा गोंधळ सुरु असताना तिथे विद्यापीठाचे सुरक्षारक्षक आणि चतु:श्रुंगी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी पाहत होते.
विद्यापीठाविरुद्ध सातत्याने बातम्या प्रसिद्ध करीत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने आपल्याविरुद्ध आपणास मानसिक त्रास देण्यासाठी, शैक्षणिक करियर खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास खडकी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार करीत आहेत.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरु, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसीटीचा गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jul 2019 07:45 PM (IST)
विद्यापीठाविरुद्ध सातत्याने बातम्या प्रसिद्ध करीत असल्याने विद्यापीठ प्रशासनाने आपल्याविरुद्ध आपणास मानसिक त्रास देण्यासाठी, शैक्षणिक करियर खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -