Sanjay Raut Meets Mamata : ममता आणि संजय राऊत यांची ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये भेट, काय झाली चर्चा?
abp majha web team | 30 Nov 2021 07:30 PM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाल्या आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संध्याकाळी हॉटेल ट्रायडंट येथे ममता बॅनर्जींची भेट घेतली. ममता बॅनर्जी या उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोट बांधण्याच्या दृष्टीनं या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, ममतादीदींनी प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन आपल्या मुंबई दौऱ्याची सुरुवात केली. यावेळी त्यांनी दिलेल्या जय मराठा, जय बांगला या नाऱ्यामधूनही राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.