Mamata Banerjee Mumbai Visit : जय मराठी, जय बांगला; ममतांच्या दौऱ्याचा राजकीय अर्थ काय? ABP Majha
abp majha web team | 01 Dec 2021 07:28 AM (IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं काँग्रेससोबतचं भांडण एकीकडे वाढत चाललं आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी आपल्या मुंबई दौऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांच्या या भेटीगाठींचा राजकीय अर्थ कसा काढायचा? कारण महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांसोबत काँग्रेसनं सरकार बनवलं आहे. त्यामुळं ममता बॅनर्जी यांच्या या भेटींना राजकीय महत्व आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.