Ashadhi Wari 2022 : पंढरपूरच्या आषाढी पायी वारीसाठी निघालेल्या पालख्या आता पंढरपूरजवळ आल्या आहेत. तुकाराम महाराजांना ज्या टप्प्यावरून विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता तिथून वारकरी सुद्धा धावत धावा पूर्ण करतात अशी प्रथा आहे. आजसुद्धा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी या ठिकाणाहून धावत होते. त्यावेळी प्रत्येकाच्या मुखी माऊली माऊलीचा जयघोष होता.  


कळस ते पंढरपूर पळत जाण्याची आख्यायिका 


अशी आख्यायिका सांगितली जाते की, या ठिकाणावरून तुकाराम महाराजांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कळस दिसला होता आणि तिथून तुकाराम महाराज पंढरपूरपर्यंत पळत गेले होते. त्यामुळे वारकरी सुद्धा " तुका म्हणे धावा आता पंढरी विसावा "; असं म्हणत या टप्प्याच्या ठिकाणाहून पंढरपूरकडे धावत जात असतात. पंढरपूरच्या या आषाढी वारीमध्ये प्रत्येकाला वेगळी परंपरा आहे. अगदी टाळकरी.. मृदुंग वादक.. तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि दिंडीच्या समोर चालणारे पथक पताकाधारी यांच्याही वेगवेगळ्या प्रथा या ठिकाणी पाहायला मिळतात. 


पालखी सोहळ्या दरम्यान अनेक पताकाही फडकताना दिसतात. या पताकांचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण पालखी सोहळ्यामध्ये या पताका कुठेही खाली ठेवल्या जात नाहीत. ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणीसुद्धा पताका उभ्या करून ठेवल्या जातात. 


रूपाली चाकणकर यांनी आषाढी वारीतील महिला वारकऱ्यांच्या सुविधाची केली पाहणी


महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी आज माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी राबविण्यात आलेला हिरकणी कक्षाला भेट दिली. त्याचबरोबर आषाढी वारीमध्ये महिलांसाठी सुरू करण्यात आलेला सॅनिटरी पॅडचा उपक्रम आदींबाबत आपत्ती व्यवस्थापन कक्षात भेट देऊन पाहणी केली. तसेच वारीमध्ये महिलांना देण्यात आलेल्या सेवा सुविधांचा त्यांनी आढावा घेतला.


तसेच यावर्षी आलेल्या अडचणी लक्षात घेऊन पुढील वर्षी वारी सोहळ्यामध्ये त्यामध्ये आपण सर्वजण मिळून बदल करूया. आपल्या सर्वांच्या साथीने हा वारी सोहळा महिलांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असल्याचेही यावेळी त्यांनी बोलताना सांगितले. 


महत्वाच्या बातम्या :