Aravind Sawant : मी महिलांचा कधीही अपमान केला नाही आणि करणारही नाही. माझ्या वक्तव्यामुळं जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Aravind Sawant) यांनी केलं. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे, त्यानंतर 1 तारखेला अनेक भगिनी या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाल्याचे सावंत म्हणाले. अरविंद सावंत यांनी शायना एनसी (Shaina NC) यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केलं होतं. याबाबत त्यांनी माफी मागितली आहे. 


आपण बघताय दोन दिवस झाले माझ्यावर एकप्रकारे हल्ला सुरु आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून मी काम करतो. माझ्यावर ज्या प्रकारे अनेक जणांनी हल्ले केले त्यांनी माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी असे सावंत म्हणाले. 29 तारखेला मी जे काही बोललो आहे. त्यानंतर 1 तारखेला भगिनी ह्या पोलीस स्टेशन मध्ये गेल्या आणि माझ्या वर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सावतं म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले होते अरविंद सावंत?


एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी शिवसेना नेत्या शाइन एनसी यांच्यावर निशाणा साधला आणि सांगितले की, त्यांची अवस्था बघा, त्या आयुष्यभर भाजपमध्ये राहिल्या आता दुसऱ्या पार्टीत गेल्या आहेत. इथं 'इम्पोर्टेड माल'  चालत नाही, फक्त ओरिजनल माल येथे चालतो. त्यांच्या वक्तव्यावर मुंबादेवी मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांनी पलटवार करत माफी मागण्याची मागणी केली. "ते स्त्रीचा आदर करू शकत नाहीत," असे त्या म्हणाल्या होत्या. अरविंद अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या नेत्या  शायना एनसी यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर गदारोळ सुरु झाला आहे. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला. अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, महिलांचा सन्मान केला पाहिजे. अशा प्रकारची टिप्पणी निषेधार्ह आहे. राजकारणात महिलांचा सन्मान झाला पाहिजे असं ते म्हणाले होते.


महत्वाच्या बातम्या:


Shaina NC Vs Arvind Sawant : 'इम्पोर्टेड माल' खासदार अरविंद सावंतांच्या अंगलट; शायना एनसीच्या तक्रारीवरून मुंबईत गुन्हा दाखल