काही दिवसापासून आपली पत्नी माहेरी निघून गेल्याने गंगाराम विचलित अवस्थेत होता. गंगाराम हा चित्रकलेत पारंगत आणि वारली चित्रकार होता. 8 जून 2020 रोजी गंगारामने आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्या चित्रावर दि 15-7-2020 बुधवार, असा मृत्यू दिनांक टाकला. आणि चित्राला हार घालून त्याचा फोटो काढून त्यांच्या एक आप्तेष्टाला व्हॉटअप्सद्वारे फोटो पाठवला.
सध्या पाऊस चांगला असल्याने शेतीची काम सुरू आहेत. त्यामुळे काल गंगारामच्या घरातील सर्व माणसं आपल्या भात लावणीच्या कामासाठी शेतीवर निघून गेली होती. दरम्यान गंगाराम एकटाच घरी होता. त्याने घरातच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. गंगाराम चौधरी हे चळणी येथील शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे लग्न 2016 साली झाले होते. त्यांना एकही अपत्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पालघर जिल्ह्यातील दोन आमदार शेतीच्या कामात गुंतले, कुटुंबासोबत पारंपरिक भात लावणी
कौटुबिक वादातून आत्महत्या केल्याचा अंदाज
काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नीही माहेरी गेली होती. गंगाराम हे चांगले वारली चित्रकार ही होते. ते शाळेतील काम संपल्यावर सतत वारली पेंटिंग करून त्या विक्रीही करायचे. अजूनही आत्महत्येचं कारण समजू शकले नसले तरीही ही आत्महत्त्या कौटुंबिक वादातून झाली असल्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद कासा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून कासा पोलीस ठाण्याच्या एपीआय सिद्धवा जायभाये यांच्या नेतृत्वाखाली कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.
नैराश्य वाढतंय
कोरोना व्हायरसमुळे सर्वांनाच लॉकडाऊन अनिवार्य झाले आहे. मात्र, लॉकडाऊनमधील क्वॉरंटाईन हे मानसिक आरोग्यवर परिणाम करत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विनाअनुदानीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. घरात बसून राहावे लागत असल्याने लोकांमध्ये नैराश्य वाढत असल्याचे सांगितले आहेत.
Anil Deshmukh | पालघर झुंडबळी प्रकरणी सीआयडीकडून आरोपपत्र दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख