Arjun Khotkar On BJP : लोकसभा उमेदवारीवरून महायुतीमध्ये (Mahayuti) सुरु असलेली खदखद आता थेट समोर येऊ लागली आहे. 'शिवसेनेच्याच (Shiv Sena) जागेवर कशासाठी गोंधळ केला जातोय, भाजप (BJP) आमच्याच जागेवर का हट्ट करत आहेत. त्यामुळे एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे असा थेट इशारा शिंदेसेनेचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील वाद (Mahayuti Dispute) टोकाला पोहचला असल्याचे दिसून येत आहे. 


'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना अर्जुन खोतकर म्हणाले की, "भाजपला 20 जागा जाहीर करण्याचा  जसा अधिकार आहे, तसाच आमच्या 18 जागा जाहीर करण्याचा आम्हाला अधिकार होताच ना?, आम्ही चौकट ओलांडली नाही, पण त्यांनी उमेदवार जाहीर केले आणि आम्हाला ताटकळत ठेवलं. परभणी, संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, वाशिम आमचं आहे. मात्र, या जागेबाबत रिपोर्टचा आधार घेऊन तुम्ही माघात असाल तर हे न्यायसंगत नाही, असे खोतकर म्हणाले. 


'एक घाव दोन तुकडे होऊन जाऊदे'


नाशिकच्या जागेवर देखील आमचा विद्यमान खासदार आहे. मात्र, तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार किंवा भाजपचा उमेदवार पुढे केला जातोय. माझ्यामते एक घाव दोन तुकडे व्हायला पाहिजेत. आमच्या जागेवरच का हट्ट? तुमच्या जागा आम्ही मागितल्या का? असा सवाल देखील खोतकर यांनी विचारला आहे. 


दानवे-खोतकर वाद मिटला का? 


जालना लोकसभा मतदारसंघातील (Jalna Lok Sabha Constituency) भाजप उमेदवार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याबद्दल खोतकरांच्या कार्यकर्त्यांनी मागील आठवड्यात थेट नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान यावरच बोलतांना खोतकर म्हणाले की, "रावसाहेब दानवे यांच्या वागणुकीमध्ये अजून बदल होत नाहीये. मात्र, मी माझी जबाबदारी शंभर टक्के पार पाडणार. दानवे फेअर पद्धतीने वागताना दिसत नाहीयेत. तोंडावर चांगलं बोलायचं आणि माघारी वाईट बोलायचं हे चांगलं नाही. आमचा नेता एकनाथ शिंदे खंबीर सक्षम आहे. माझ्याकडून दानवेंबाबत मनोमिलन पूर्ण आहे. माझ्या मनात काहीही नाही. मी माझं 100 टक्के काम करणार, जे पहिले होतं तसं आता राहिलं नाही, असेही खोतकर म्हणाले. विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीत खोतकर विरुद्ध दानवे असा थेट वाद पाहायला मिळाला होता. शेवटी पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Mahayuti Meeting : नाराजीनाट्यावर शिंदे, फडणवीसांसह अजित पवारांची वर्षावर मध्यरात्री बैठक; नेमकं बैठकीत काय ठरलं?