मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपासासाठी केंद्राकडून सीबीआयची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु तो विषय मागे पडला आहे. सुशांतसिंह राजपूत हत्या की आत्महत्या या प्रकणाचा सखोल तपास व्हावा, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे. एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्रा'चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.


सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि कंगना वादावर प्रश्न विचारला असता अनिल देशमुख म्हणाले, या विषयावर चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. त्यामुळे या पेक्षा अनेक मोठे विषय आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा तपास चांगल्या प्रकारे केला आहे, असे सुप्रीम कोर्टाने देखील म्हटले आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचे असे काही मंडळीनी ठरवले आहे.


मुंबई पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणात एफआयआर का देखील नाही, या प्रश्नाला उत्तर देताना देशमुख म्हणाले, 'सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी कोणावरही संशय नाही असे लिहून दिले होते, मग गुन्हा कोणावर दाखल करायचा.'


शासनात काम करताना अनेकांना अशा गोष्टी होतात. पंतप्रधानांना देखील फोन आले आहेत. त्यामुळे धमकीचे फोन येणे यात काही मोठी गोष्ट नाही.


मुंबईत ड्रग्जची कीड अनेक वर्षांपासूनची कीड आहे. सुशांतसिंह प्रकरणामुळे अनेक गोष्टी समोर होत आहे. त्यांची योग्य ती चौकशी होईल. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ही देशातील मोठी संस्था आहे. याचे जाळे भारतभर आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे आहे. या संदर्भात खोलवर चौकशी केली पाहिजे.


पोलीस भरतीवर देशमुख म्हणाले, राज्यातील सर्वात मोठ्या भरतीचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. आर्थिक टंचाई असताना देखील पोलिसांच्या घरांसाठी 700 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पोलिसांच्या प्रश्नावर सरकार काम करत आहे.




  • प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमातील अन्य महत्वाच्या बातम्या


राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं : आरोग्यमंत्री राजेश टोपे

महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे : संजय राऊत


इतर राज्यांच्या तुलनेत केंद्रानं महाराष्ट्राला दुप्पट दिलंय : प्रवीण दरेकर


सरकारसाठी कोरोना हाच मुख्य मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला : गुलाबराव पाटील


Home Minister Anil Deshmukh, sushant singh case, CBI, ...तोवर उसतोड कामगारांनी कोयता म्यान ठेवावा, पंकजा मुंडेंचं आवाहन