Bhendwal Ghatmandni बुलढाणा : राज्यभरातील (Maharashtra News) शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांसाठी बहुप्रतिक्षित असलेली भेंडवळची घट मांडणी (Bhendwal Ghat Mandani) आज होत आहे. या घट मांडणीचे अंदाज उद्या सकाळी जाहीर केल्या जाणार आहे. या घटमांडणीच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असतो आणि त्यानुसार वर्षभराच्या पीक पाण्याचं (Rain Updates), शेतीचं नियोजन शेतकरी करत असतात . मात्र ही घट मांडणी निव्वळ थोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे. शेतकऱ्यांनी या अवैज्ञानिक मांडणीच्या भाकितांवर विश्वास ठेवू नये, अस आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून (Akhil Bharatiya Andhashraddha Nirmoolan Samiti) करण्यात आलं आहे.


याशिवाय या घटमांडणीत राजकीय भाकीत सुद्धा केली जातात. यावर्षी देशभरात निवडणुका (Lok Sabha Election 2024) होत आहेत आणि अजूनही चार टप्पे मतदानाचे बाकी आहेत. देशात सगळीकडे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे या घट मांडणीनंतर जर राजकीय भाकिते किंवा अंदाज व्यक्त केला गेला तर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी स्पष्ट केले आहे.


अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचा आक्षेप


राज्यभरातील शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांच लक्ष लागून राहिलेल्या भेंडवळची घट मांडणी  आज होणार आहे. या मांडणीचे अंदाज उद्या सकाळी म्हणजे, 11 मे रोजी सूर्योदयावेळी जाहीर केले जातील. यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांचं लक्ष या अंदाजाकडे लागून आहे. या मांडणीतून वर्षभराचा पाऊस, पिकं, शेती यासोबतच देशाच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं जातं. यावर्षी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे देशाच्या राजाबद्दल अर्थात पंतप्रधानांबद्दल या मांडणीतून काय अंदाज समोर येतो? हे बघणं महत्त्वाचं आहे. या मांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी मात्र राज्यातील शेतकरी, राजकीय नेते यांवर विश्वास ठेवतात.


घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड- अभयसिंह मारोडे


आज सायंकाळी सूर्यस्तावेळी ही घट मांडणी केली जाणार असल्यानं आज मराठवाडा, खान्देश, विदर्भातून हजारो शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामी येतात. शिवाय अनेकांची या परंपरेवर विश्वास आहे. असे असतांना या पद्धतीवर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत इशारा दिला आहे. ही घट मांडणी म्हणजे निव्वळ थोतांड असून अतार्किक आणि अवैज्ञानिक आहे. परिणामी शेतकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन बुलढाण्याच्या अखिल भारतीय अन्द्धश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अभयसिंह मारोडे यांनी केले आहे. तसेच, यावेळी कुठले राजकीय भाकीत केल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या