मुंबई : उद्या पत्रकार परिषद घेऊन हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा नवाब मलिकांनी दिलाय. पण त्याआधी नेहमीच ट्विटरवर चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत मलिकांवर निशाणा साधलाय. त्यामुळं मलिक आणि फडणवीस वाद तुर्तास तरी थांबण्याची चिन्हं नाहीत.
अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, पत्रकार परिषदा घेत नवाब मलिकांनी कायम खोट्या गोष्टी सांगितल्या. त्यांचे केवळ एकच ध्येय आहे, आपला जावई आणि काळे धन लपवायचे आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी केलेले आरोप खोडून काढत कुणी अंगावर आलं तर सोडणार नाही असा इशारा नवाब मलिकांना दिला होता. मर्द असाल तर तुम्ही फडणवीसांना टार्गेट करा माझ्यावर कसले आरोप करता माझा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही असं देखील अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
Amruta Fadnavis : माझ्या अंगावर कुणी आलं तर त्याला सोडणार नाही : अमृता फडणवीस
देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन राज्यात ड्रग्जचा खेळ सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीसांनी नदी संरक्षणासाठी गाणं गायलं होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनय केला होता. डायरेक्टर सचिन गुप्ता होते. ते गाणं अभिजीत जोशी यांनी लिहिलेले होते. त्याचे फायनान्स हेड ड्रग्स पेडलर जयदीप राणा होता. जयदीप राणा यांच्यासोबत फडणवीसांचा काय संबंध आहे? याची चौकशी व्हायला पाहिजे, असं मलिक म्हणाले होते. देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात ड्रग्सचे धंदे चालतात. जयदीप राणा हे फडणवीसांच्या घरच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात. ड्रग्स रॅकेटला फडणवीस संरक्षण देतात, असा गंभीर आरोप मलिक यांनी यावेळी केला होता.