Amravti Voilance : अमरावतीत हिंसाचार होऊन आठवडा लोटल्यानंतर आता संचारबंदीत काहीशी शिथिलता देण्यात आली आहे. आज शहरातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आणि कृषी साहित्याची दुकानं सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडणार आहेत. परीक्षार्थींना संचारबंदीत सवलत कायम ठेवण्यात आली आहे. 


त्रिपुराच्या घटनेचे पडसाद राज्यात उमटु लागल्यानंतर काही हिंसाचाराच्या घटनांमुळे 13 नोव्हेंबरला अमरावतीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर अफवा रोखण्यासाठी 6 दिवस जिल्ह्यात इंटरनेट बंदी घालण्यात आली होती. अशातच आज इंटरनेट सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच जिवनावश्यक वस्तू आणि शेती विषयक कामांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुट देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 22 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी कायम रहाणार आहे. 


दरम्यान, अमरावतीतील दंगल भडकवल्याप्रकरणी अटक केलेले भाजप नेते अनिल बोंडेंसह (Anil Bonde Arrest) सर्व भाजप नेत्यांना जामीन मंजूर झाला आहे. अमरावती पोलिसांनी बोंडेंसह भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, महापौर चेतन गावंडे, गटनेते तुषार भारतीय, जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्यासह 12 जणांना अटक केली होती. 


अमरावती हिंसाचाराप्रकरणी अनिल बोंडेंना जामीन


माजी मंत्री आणि भाजप नेते डॉ. अनिल बोंडेंना (Anil Bonde Arrest) जामीन मिळाला आहे. अमरावतीतील सिटी कोतवाली पोलिसांनी डॉ. अनिल बोंडेंवर ही कारवाई केली होती. दंगल भडकवणे, दंगल भडकवण्यासाठी प्रवृत्त करणे अशा कलमांतर्गत डॉ. अनिल बोंडेंवर गुन्हे नोंद  करण्यात आले आहेत. भाजपकडून पुकारलेल्या बंद दरम्यान झालेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. डॉ. अनिल बोंडेंच्या नेतृत्वात शनिवारी भाजपनं अमरावतीत आंदोलन केलं होतं. त्यात झालेल्या हिंसेला बोंडे  जबाबदार असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी अनिल बोंडेंना अटक केली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Amravati Violence : अनिल बोंडेंकडून अमरावती हिंसाचाराचं समर्थन; ऑडिओ क्लिप ट्वीट करत मलिकांचा हल्लाबोल