अमरावती: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात मुलामुलींच्या शिष्यवृत्तीसाठी एक कोटी रुपयांची देणगी देत असल्याची घोषणा केली आहे. ही शिष्यवृत्ती संस्थेच्या कृषी आणि मेडिकल महाविद्यालयातील मुला-मुलींसाठी देण्यात येणार आहे. कृषी महाविद्यालय आणि मेडिकल कॉलेजमध्यील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करावी अशी सूचना त्यांनी संस्थेला केली. त्याची सुरुवात स्वत: पासून करत असल्याचं सांगत गरीब विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी  एक कोटी रुपायांची घोषणा केली. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 57 व्या पुण्यतिथी पर्वावर आयोजित छत्रपती श्री. शिवाजी महाराज प्रेक्षागृहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


डॉ. पंजाबराव देशमुख यांनी ज्या गोरगरीब लोकांच्या शिक्षणासाठी श्री. शिवाजी शिक्षण संस्था काढली त्या उद्धेशाने संस्थेचे कार्य सुरु आहे असं शरद पवार म्हणाले. या संस्थेने गरीब मुलामुलींच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याची सूचना करण्यासोबतच‘राष्ट्रवादी वेलफेअर फंड’ मधून या कार्यासाठी एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. या देणगीतून तीन मुलींना वैद्यकीय शिक्षणासाठी आणि तीन मुलींना कृषी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी अशी सूचना केली.


प्रेक्षागृहासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्व. रावसाहेब इंगोले स्मृती प्रवेशद्वाराचे लोकार्पण देखील शरद पवार यांच्या हस्ते झाले. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेल्या या प्रेक्षगृहाचा उद्घाटन सोहळा संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री सुनील केदार, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


महत्त्वाच्या बातम्या: 


Ekhanath Khadase : शरद पवारांच्या घरासमोरील आंदोलनामागे भाजपचा हात; एकनाथ खडसेंचा थेट आरोप
Sharad Pawar : एसटी कामगारांना भडकवलं, त्यांना चुकीच्या मार्गाला लावलं: शरद पवार
अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी झडती घेण्यासाठी पोलिसांचं पथक दाखल; पुरावे गोळा करण्याचं काम सुरू