Amravati अमरावती : लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा (Navneet Rana) यांचा जवळपास 28 हजार मतांनी पराभव झाला. येथील मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) विजयी झाले आहेत. त्यामुळे, राणा दाम्पत्यास पराभवाचा मोठा धक्का जनतेने दिला आहे. या निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी आता विधानसभेसाठी (Election 2024) तयारी सुरू केली आहे का? हा प्रश्न सध्या अमरावती मतदारसंघातील राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. त्यामागील कारण म्हणजे नवनीत राणांनी आपल्या मतदारसंघात काल गुरुवार (6 ऑगस्ट) पासून सुरू केलेला संवाद दौरा हा आगामी निवडणुकांची मोर्चे बांधणी असल्याच्या चर्चा आहे. 


तब्बल 7 दिवस त्या मेळघाटमध्ये संवाद दौरा 


अमरावतीच्या भाजप नेत्या नवनीत राणा यांचा कालपासून संवाद दौरा प्रारंभ झाला असून मेळघाटच्या शेवटच्या गावापासून हा संवाद दौरा सुरू झाला आहे. मेळघाट, अचलपूर, दर्यापूर, तिवसा, अमरावती आणि बडनेरा मतदारसंघात नवनीत राणा संवाद दौऱ्यानिमित्ताने जनतेशी संवाद साधणार आहेत. नवनीत राणा यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्या पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. तब्बल 7 दिवस त्या मेळघाट मधील गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधणार असून त्यानंतर इतर विधानसभा क्षेत्रात जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपसाठी त्या विधानसभेची मोर्चेबांधणी देखील करत असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहे. परिणामी, लोकसभेच्या परभवानंतर विधानसभेसाठी नवनीत राणा शड्डू ठोकणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 


अमरावतीच्या आठ ही जागा महायुतीचा उमेदवार जिंकणार- नवनीत राणा   


यावेळी एबीपी माझाशी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, आपण केवळ मतदान घेण्यासाठीच मतदारांपर्यंत गेलो नाही पाहिजे. या लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं आहे. हे तेच  प्रेम आहे की एवढ्या मोठ्या धक्क्यातून मला बाहेर काढून मला इथपर्यंत आणलं आणि परत तयारीला लागली. नवनीत राणाचं पराभव झाला तेव्हा राज्यासह देशात अनेकांना धक्का लागला. सेवा करण्याची जी मानसिकता आहे ती विधानसभेत नक्की दिसनार. माझ्या जिल्ह्याला समोर नेण्यासाठी मी उभी राहून येणाऱ्या भविष्यात सगळ्यांना दिसेल. राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आणि अमरावती जिल्ह्यात आठ ही जागेवर महायुतीचा उमेदवार निवडून येईल. असा विश्वासही नवनीत राणा यांनी बोलताना व्यक्त केला.  


इतर महत्वाच्या बातम्या