नवी दिल्ली : अनेकदा आपण रस्ता अपघातात (Road Accident) कोणी जखमी होताना पाहतो, तेव्हा बहुतेक लोक अपघाताबद्दल चर्चा करून निघून जातात. भारतात रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच आहे, त्याची कारणे अनेक आहेत. मात्र यामागील मुख्य कारण म्हणजे जखमी व्यक्तीला वेळेवर रुग्णालयात पोहोचणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नोएडामधील गौतमबुद्ध नगरमध्ये विशेष मोहीम राबवली आहे.


अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचल्यावर बक्षीस
या नवीन मोहिमेची माहिती देताना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त गणेश साहा यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, कोणत्याही रस्त्यावरील अपघातात त्या व्यक्तीला वेळीच उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचवणे सोपे होते. मात्र, अनेकदा लोक जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेणे टाळतात, त्यामुळे बहुतांश लोकांना गंभीर अपघातात जीव गमवावा लागतो. हे पाहता नोएडाच्या वाहतूक विभागाने एक विशेष उपक्रम सुरू केला आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने रस्ता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेले तर वाहतूक पोलीस त्याला 5 हजार रुपयांचे बक्षीस देणार आहेत.


पोलिसांना जाब द्यावा लागणार नाही
गणेश साहा यांनी पुढे सांगितले की, बहुतेक लोक जखमींना मदत करणे टाळतात कारण त्यांना भीती असते की यानंतर पोलीस त्यांना अनेक प्रकारचे प्रश्न विचारतील, म्हणूनच जेव्हा ते रस्त्यावर अपघातात जखमी झालेले पाहतात, तेव्हा तेथून बाजूला होतात. मात्र आता कुणाला मदत केली तर पोलिसांना जाब द्यावा लागणार नाही. अपघात कुठे झाला आणि तुम्ही ज्याला घेऊन आला आहात त्या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, असे साधे प्रश्न पोलीस तुम्हाला विचारतील, इतकेच सोपे प्रश्नोत्तरे केली जातील.


तुम्ही अशी मदत करू शकता
ट्रॅफिक पोलिसांनी माहिती दिली की, एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्हाला फक्त 112 वर कॉल करावा लागेल, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागेल आणि त्या व्यक्तीला अॅडमिट करावे लागेल आणि हॉस्पिटलच्या फॉर्ममध्ये तुमचे नाव भरावे लागेल.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha