Chandrashekhar Bawankule on Navneet Rana : अमरावती महानगरपालिकेचा महापौर भाजपचा आणि महायुतीचा होणार असल्याचा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. प्रत्येक बुथवर 10 मत मिळाले असते तरी नवनीत राणा (Navneet Rana)  या खासदार झाल्या असत्या. लोकसभा निवडणुकीचा नवनीत राणा यांचा झालेला पराभव हा आपल्या जिव्हरी लागला असल्याचे बावनकुळे म्हणाले. दरम्यान, एका बाजुला चंद्रशेखर बावनकुळे यांचे दमदार भाषण सुरु असतानाच भाजप नेते आमदार संजय कुटे यांना लागली झोपेची डुलकी लागल्याचं पाहायला मिळालं. संजय कुटे यांना डुलकी लागल्याचा व्हिडिओ सर्वत्र चांगलाच व्हायरल होत आहे. 

Continues below advertisement


1 कोटी मताचा फरक काढून घेण्याची शक्ती आता महविकास आघाडीमध्ये नाही


निवडणुकीमध्ये आपण जेवढे उमेदवार लढू तेवढे निवडून आणणार असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. 1 कोटी मताचा फरक काढून घेण्याची शक्ती आता महविकास आघाडीमध्ये नाही. तुमच्या विरुद्ध काँगेस जर लढली तर त्यांचा परभव झाला समजून समजा असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महायुतीला जिंकवायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन पुढे चालावं लागेल असं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं. अमरावतीत भाजप पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. 


काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणांचा केला होता पराभव 


लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला होता. राज्यात 48 पैकी 40 हून अधिक जागा जिंकण्याचा महायुतीला कॉन्फिडन्स होता. एक्झिट पोलनेही महायुती चांगली कामगिरी करत असल्याचे सांगितले होते. मात्र, निकालानंतर भाजपने तयार केलेली सर्व हवा विरली आणि एक्झिट पोलचे आकड्यांचीही धूळधाण झाली. महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावे लागेल. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन कारावा लागला होता. यामध्ये अमरावती लोकसभा भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा देखील पराभव झाला होता. अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 26 हजार 271 मते मिळाली होती. तर नवनीत राणा यांना 5 लाख 6 हजार 540 मते मिळाली होती. वानखेडेंनी 19 हजार 731 मतांनी आघाडी घेत राणांचा पराभव केला होता. अशातच आता नवनीत राणा यांचा पराभव जिव्हारी लागल्याचं वक्तव्य चंद्रशेकर बावनकुळे यांनी केलं आहे.


महत्वाच्या बातम्या:


Chandrashekhar Bawankule : दुबार मतदार यादी ही 25 वर्षांपासून, संपूर्ण यादी स्क्रॅप केल्याशिवाय... चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?