मुंबई : राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करताच रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांना पहिली ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू अशी ऑफर सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिली. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे रुपाली ठोंबरे यांची हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांना वगळण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे असा वाद सुरू आहे. त्याचाच फटका रुपाली ठोंबरे यांना बसला असल्याची चर्चा आहे.
Rupali Patil Thombare News : ठाकरे गटाची खुली ऑफर
राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करताच ठाकरे गटाकडून रुपाली ठोंबरे यांना ऑफर आली आहे. रुपाली ठोंबरे या माझ्या चांगल्या मैत्रिण आहेत. त्यांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करावी, आम्ही त्याचं स्वागत करू असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, "रूपाली ठोंबरे ही माझी चांगली मैत्रीण आहे आणि ती राहील. तिला कोणतेही भीती नाही, ईडी किंवा सीबीआयचा तिला बॅकेज नाही. सर्वार्थाने ती अतिशय क्लीन इमेज असलेली व्यक्ती आहे. अशी महिला कुठच्याही पक्षात येणं कोणालाही आवडेलच. पण माझ्या पक्षात ती यावी म्हणून तिच्या त्या पक्षात नुकसान व्हावं असा विचार करणारी मी नाही. जर तिच्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर तिनं तिथे काम करावे."
Rupali Patil Thombare Vs Rupali Chakankar : रुपाली ठोंबरेंची प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षातील दोन महत्त्वाच्या नेत्यांना चांगलाच दणका दिल्याचं दिसून येतंय. नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून अजित पवारांनी रूपाली पाटील ठोंबरे आणि आमदार अमोल मिटकरींना वगळलं. वारंवार पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं ठोंबरेंना डच्चू दिल्याचं बोललं जातंय. तर भाजपवर आगपाखड करणाऱ्या अमोल मिटकरींना अजितदादांनी पदावरून पायउतार केल्याची चर्चा आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांविरोधात रूपाली ठोंबरेंनी रान पेटवलं होतं. असं असताना शनिवारी रूपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेऊन स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मात्र अजित पवारांनी ठोंबरेंचं डिमोशन केलं. तर मारहाण प्रकरणात वादात सापडलेल्या सूरज चव्हाणांना प्रवक्तेपद देण्यात आलं. मारहाण प्रकरणानंतर सुरज चव्हाणांचं पद काढलं होतं. आता पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत त्यांना संधी मिळाली आहे.
ही बातमी वाचा: