Weather Update Today : राज्यासह देशात गुलाबी थंडी (Cold Weather) चाहूल लागली आहे. मात्र, काही भागात अवकाळी पावसाची (Rain Alert) हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यात (Maharashtra Weather) अनेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ पाहायला दिसत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. परिणामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यासह देशातील काही भागात पुढील 48 तास पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 


पुढील 48 तासांत पावसाची शक्यता


आज महाराष्ट्रासह देशात पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही भागात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. एकीकडे गुलाबी थंडीची चाहूल लागली असताना वायू प्रदूषणामध्ये देखील वाढ झाल्याचं दिसून येत आहे.


येत्या 5 दिवसांत दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता


हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 11 नोव्हेंबरपर्यंत येथे पाऊस संपण्याची शक्यता आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही पाऊस पडू शकतो.


'हिमाचल प्रदेशात 8 नोव्हेंबरपासून बर्फवृष्टी होणार'


आजपासूनच जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्याच वेळी, हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवर्षावाचा कालावधी 8 नोव्हेंबरपासून सुरू होईल, तर उत्तराखंडमध्ये 9 आणि 10 नोव्हेंबरला पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये 9 नोव्हेंबरपासून हलका पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने म्हटले आहे. तर मध्य आणि पूर्व भारतात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे


9 नोव्हेंबरपर्यंत पावसाची अंदाज


पुढील दोन दिवस देशातील काही भागात पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 नोव्हेंबरला जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानच्या मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Demonetisation : मोदी सरकारच्या नोटबंदीला 7 वर्षे पूर्ण! आजही आठवतं ATM आणि बँकांबाहेरील रांगाचं चित्र; याचा काय फायदा झाला?