मुंबई  : जगभरातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 23 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 7 रुग्ण पिंपरी-चिंचवड, मुंबईत 5 , उस्मानाबादेत दोन रुग्ण, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर  येथील  प्रत्येकी एक रुग्ण  आहे. आतापर्यंत राज्यात  ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


मुंबई विमानतळावर सापडलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर  प्रत्येकी एक रुग्ण हा छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद  येथील आहेत. आज सापडलेल्या 23 रुग्णांपैकी 18 रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर एकाचे लसीकरण झालेले नाही. तर चार रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.


पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सात ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण झाले आहे. यात दोन नेदरलँड, एक साऊथ आफ्रिका, एक दुबई, एक सिंगापूर तर दोन संपर्कात आलेल्यांचा समावेश आहे. यापैकी दुबई, सिंगापूर आणि संपर्कातील दोघे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळं आता शहरातील ओमयक्रोन पॉझिटिव्हची संख्या 19 वर पोहचली असून, दहा जणांनी ओमयक्रोन वर मात केलेली आहे. 


देशात आतापर्यंत 236 ओमायक्रॉनबाधित 


देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा सर्वात घातक व्हेरियंट ओमायक्रॉनचा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. सध्या देशात घातक व्हेरियंट ओमायक्रॉनचे 236 रुग्ण आहेत. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 


भारतात ओमायक्रॉनची सध्याची स्थिती : 



  • एकूण रुग्ण : 236

  • एकूण रिकव्हरी : 104

  • किती राज्यात संसर्ग : 16 


महत्त्वाच्या इतर बातम्या :