Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यानी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच कामांचा धडाका लावला आहे. तर पूरग्रस्त भागात स्वतः जाऊन मुख्यमंत्री यांनी पाहणी केली. दरम्यान त्यांच्या याच कामाचे कौतुक करत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले असल्याच म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरेंच्या काळातील राहिलेल्या कामांना शिंदे यांनी गती दिली असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे. 


काय म्हणाले सत्तार...


एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने याचा आम्हाला फायदा झाला असून, महाराष्ट्राला 18 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहे. गेल्या अनेक दिवस आमदारांची जी कामे थकली होती, त्याला न्याय देण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात जे काही बाकी राहिलं होतं ते पूर्ण करण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत. शिवसेनेचे अनेक खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढे काय-काय होणार हे पाहत चला. एकनाथ शिंदे हे एक समुद्र असून, छोटे-छोटे नेते या समुद्राला येऊन मिळणार आहे. तसेच 19  किंवा 20 तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. ज्यांना एकनाथ शिंदे यांचा फोन आला त्याला मंत्रिपद मिळणार, असेही सत्तार म्हणाले. 


मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?


शिंदे मंत्रिमंडळाचा लांबणीवर पडलेला मंत्रिमंडळ विस्तार 19 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. यावेळी भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटानं 20 मंत्रिपदांची मागणी केली आहे. पण त्यांना 15 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दोन्ही बाजूंचे प्रत्येकी 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे.


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Cabinet Decision : पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड; शिंदे सरकारचे नऊ मोठे निर्णय


नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचं अनुदान, शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा