Devendra Fadnavis : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का?, असा खोचक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. 


यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावरही वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी दौरा पुढे ढकलला आहे. रद्द केला नाही. ते लवकरच आयोध्येला जातील. आयोध्येला जाणाऱ्यांचे स्वागत करावे ही आमची भूमिका आहे.'


नाना पटोले यांना स्मृतीभंष झाला आहे. कारण ओबीसी आरक्षण आहे. ओबीसी आरक्षण उध्दव ठाकरे यांच्या काळातच गेले आहे. असाही टोला फडणवीस यांनी लगावला. संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? संभाजी राजेंना आम्ही आमच्या कोट्यातून खासदार केले. मात्र त्यांना कधीही पक्षाचा प्रचार करायला लावला नाही.  संभाजीराजे यांना सहावी जागा का देतायत त्यांना महत्वाची जागा द्यावी.'  



यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल करत म्हणाले की, 'संजय राऊत हे महत्त्वाची व्यक्ती नाही. त्यांना कुणी गांभीर्याने घेत नाही.' हे महाविकास आघाडी सरकार केवळ ढोलकी वाजविण्यात व्यस्त आहे. ते ट्रिपल टेस्ट का करु शकले नाही, याचे उत्तर या सरकारने दिले पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.  देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना  हर्षवर्धन पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. 


संबंधित बातम्या :