पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (Sharad Pawar NCP) कार्यालयात पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील आणि अजित पवार (Ajit Pawar) गटातून परतलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याआधी खासदार अमोल कोल्हे आणि मनसेला (MNS) सोडचिठ्ठी दिलेले माजी नगरसेवक वसंत मोरे हे दोघेही पक्ष कार्यालयात दाखल झाले. निलेश लंके आणि वसंत मोरे हे दोघेही तुतारी फुंकून, राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार अशी शक्यता होती. त्याप्रमाणे निलेश लंके यांनी प्रवेश केला, मात्र वसंत मोरे यांनी प्रवेश न करता, ते माघारी परतले.

  


 निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश (Nilesh Lanke joins NCP Sharad Pawar)


पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले होते. ते अहमदनगर लोकसभा (Ahmednagar South Lok Sabha Constituency) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला गेला आहे.  त्यामुळे निलेश लंके हे अजितदादांची साथ सोडून शरद पवार गटात सहभागी झाले. 


दुसरीकडे मनसे सोडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे वसंत मोरे हे सुद्धा आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता होती, पण त्यांनी प्रवेश केला नाही.


शरद पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरे काय म्हणाले? (Vasant More meet Sharad Pawar)


मी पक्षप्रवेशासाठी आलेलो नाही. मला सुप्रियाताईंनी आजची वेळ दिली होती, त्यामुळे मी आलो होतो. काँग्रेसच्या मोहन जोशी यांच्याशी चर्चा केली, शिवसेना नेत्यांशी पण केली. पुण्यात एक वेगळा प्रयोग होऊ शकतो. कसब्याची पुनरावृत्ती करायची असेल तर त्याला वसंत मोरे कशाप्रकारे उमेदावर असू शकतो हे सांगायला मी शरद पवारांकडे आलो होतो, असं वसंत मोरे यांनी सांगितलं. 


मी शरद पवारांना सांगितला आहे मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. ते महाविकास आघाडीतील मोठे नेते आहेत ते इतर मोठ्या नेत्यांना देखील सांगू शकतात समजू शकतात. पुढील दोन दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेन, असं वसंत मोरे म्हणाले. 


वसंत मोरेंचा मनसेला जय महाराष्ट्र (Vasant More left MNS)


मनसेचे नेते वसंत मोरे यांनी दोन दिवसापूर्वीच पक्षाला सोडचिठ्ठ दिली. वसंत मोरे हे पुण्यातून लोकसभा (Pune Lok Sabha) लढवण्यासाठी इच्छुक आहेत. वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केल्यावर ते कोणत्या पक्षात जाणार याबाबतची उत्सुकता होती. अनेक पक्षांनी वसंत मोरे यांच्याशी संपर्क केला होता.  वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याबाबत अनेक तर्क लढवले जात होते.  मी सगळं जाहीर करेन असं वसंत मोरेंनी राजीनामा देताना सांगितलं होतं.  


निलेश लंकेंनी दादांची साथ सोडली (Nilesh Lanke)


अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar)  प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. देशात लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर केली जात आहे. कालच भाजपने महाराष्ट्रातील  20 उमेदवारांची नावे जाहीर केली. निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र अजित पवार ज्या महायुतीत आहेत, त्यामध्ये नगरची जागा भाजपकडे गेली आहे, त्याठिकाणी भाजपने सुजय विखे यांना पुन्हा तिकीट दिलं आहे. त्यामुळे नाराज असलेले निलेश लंके यांनी अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या गटात प्रवेश केला.  


अजित पवारांचा निलेश लंकेंना इशारा


दरम्यान, निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याने, आज सकाळीच माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी त्यांना गर्भित इशारा दिला होता. आमदार निलेश लंके यांनी जर चुकीची भूमिका,तर त्यांना आमदारकी गमवावी लागेल . त्यांना राजीनामा द्यावा लागेल अन्यथा निलंबित होतील, असं अजित पवार म्हणाले होते.  


VIDEO :  निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश



 


संबंधित बातम्या 


Nilesh Lanke : निलेश लंकेंनी चुकीची भूमिका घेऊ नये, घेतलीच तर त्यांची आमदारकी.... , अजितदादांचा गर्भित इशारा


Nilesh Lanke : पत्र्याचं घर, शिवसेनेचा शाखाप्रमुख ते राष्ट्रवादीचा आमदार, निलेश लंके यांचा राजकीय प्रवास