Maharashtra Politics अमरावतीराज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आज पुन्हा शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मला राज्यपाल पद देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी दिलंय. मात्र अद्याप ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे संयम म्हणून मी 15 दिवस वाट बघणार, अस वक्तव्य आनंदराव अडसूळ यांनी केल असून एक प्रकारे महायुतीतील उच्चपदस्थ नेत्यांना त्यांनी इशारच दिल्याच्या बोलले जात आहे. 


दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणांच्या  (Navneet Rana)  बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे. या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया ही माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलीय. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिवसा, दर्यापूर, बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.


राज्यपाल पदासाठी अमित शाहांनी मला शब्द दिलाय- आनंदराव अडसूळ


अमित शहा (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यावरून आम्ही दोन ते तीन वेळेस माघार घेतलीय, तरी राज्यपाल पद आनंदराव आडसूळ (Anandrao Adsul) यांना का नाही? अमित शहा यांनी आनंदराव अडसूळ  यांना राज्यपाल करणार, असा शब्द मार्च महिन्यात दिला होता. मग या यादीमध्ये आनंदराव अडसूळ यांचे नाव का नाही? असा सवाल उपस्थित करत महायुतीत भाजपकडून आमच्यावर अन्याय झाला असल्याची खंत कॅप्टन अभिजीत अडसूळ (Captain Abhijeet Adsul) यांनी नुकतीच बोलताना व्यक्त केली होती. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील महायुतीमधील आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.   


भाजपकडून प्रत्येक वेळी आमच्या शब्दाला केराची टोपली- अभिजीत अडसूळ


नुकतेच सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल (Maharashtra New Governor CP Radhakrishnan) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्याजागी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी ते झारखंडचे (Jharkhand) राज्यपाल होते. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) तयारी सुरु आहे. अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या नियुक्तीवरुन आता महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना राज्यपाल पद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित करत कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या