Maharashtra Assembly 2019 MLA List : मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे  (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Vidhan Sabha Election 2024) अद्याप घोषणा झालेली नाही. पण, विधानसभेसाठी सर्व पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सर्वात आधी शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) सरकार कोसळणं, शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) साथीनं महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीनंतर राज्यातील समीकरणं बदलली आहेत. पण, यंदाच्या विधानसभेत खरी लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक होऊ शकतात. त्याआधी मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात सध्या आमदार कोण? जाणून घ्या सविस्तर... 


मुंबईतील आमदारांची संख्या : 36  (Mumbai MLA List)



  1. बोरीवली विधानसभा : सुनिल राणे (भाजप)

  2. दहिसर विधानसभा : मनिषा चौधरी (भाजप)

  3. मागाठणे विधानसभा : प्रकाश सुर्वे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

  4. मुलुंड विधानसभा : मिहीर कोटेचा (भाजप)

  5. विक्रोळी विधानसभा : सुनील राऊत (शिवसेना - उद्धव ठाकरे)

  6. भांडुप पश्चिम विधानसभा : रमेश कोरगावकर (शिवसेना - उद्धव ठाकरे)

  7. जोगेश्वरी पूर्व विधानसभा : रविंद्र वायकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) : सध्या लोकसभेवर निवड

  8. दिंडोशी विधानसभा : सुनील प्रभू (शिवसेना - उद्धव ठाकरे)

  9. कांदिवली पूर्व विधानसभा : अतुल भातखळकर (भाजप)

  10. चारकोप विधानसभा : योगेश सागर (भाजप)

  11. मालाड पश्चिम विधानसभा : अस्लम शेख (काँग्रेस)

  12. गोरेगाव विधानसभा : विद्या ठाकूर (भाजप)

  13. वर्सोवा विधानसभा : भारती लवेकर (भाजप)

  14. अंधेरी पश्चिम विधानसभा : अमित साटम (भाजप)

  15. अंधेरी पूर्व विधानसभा : ऋतुजा लटके (शिवसेना - उद्धव ठाकरे)

  16. विलेपार्ले विधानसभा : पराग अळवणी (भाजप)

  17. चांदिवली विधानसभा : दिलीप लांडे (शिवसेना : एकनाथ शिंदे)

  18. घाटकोपर पश्चिम विधानसभा : राम कदम (भाजप)

  19. घाटकोपर पूर्व विधानसभा : पराग शाह (भाजप)

  20. मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा : अबू आझमी (समाजवादी पक्ष)

  21. अणूशक्तिनगर विधानसभा : नवाब मलिक (राष्ट्रवादी)

  22. चेंबुर विधानसभा : प्रकाश फातर्पेकर (शिवसेना : उद्धव ठाकरे)

  23. कुर्ला विधानसभा : मंगेश कुडाळकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)

  24. कलिना विधानसभा : संजय पोतनीस (शिवसेना : उद्धव ठाकरे)

  25. वांद्रे पूर्व विधानसभा :  झिशान सिद्दीकी (काँग्रेस)

  26. वांद्रे पश्चिम विधानसभा : आशिष शेलार (भाजप)

  27. धारावी विधानसभा : वर्षा गायकवाड (काँग्रेस) : सध्या लोकसभेवर निवड

  28. सायन कोळीवाडा विधानसभा : कॅप्टन तमिळ सेल्वन (भाजप)

  29. वडाळा विधानसभा : कालिदास कोळंबकर (भाजप)

  30. माहिम विधानसभा : सदा सरवणकर (शिवसेना : एकनाथ शिंदे)

  31. वरळी विधानसभा : आदित्य ठाकरे (शिवसेना : उद्धव ठाकरे)

  32. शिवडी विधानसभा : अजय चौधरी (शिवसेना : उद्धव ठाकरे)

  33. भायखळा विधानसभा : यामिनी जाधव (शिवसेना : एकनाथ शिंदे)

  34. मलबार हिल विधानसभा : मंगल प्रभात लोढा (भाजप)

  35. मुंबादेवी विधानसभा : अमीन पटेल (काँग्रेस)

  36. कुलाबा विधानसभा : राहुल नार्वेकर (भाजप)


महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019, पक्षीय बलाबल (Maharashtra Assembly Election Result 2019 Party Wise Result)


भाजप : 105 
शिवसेना : 56 
राष्ट्रवादी : 54 
काँग्रेस : 44
बहुजन विकास आघाडी : 03
प्रहार जनशक्ती : 02
एमआयएम : 02
समाजवादी पक्ष : 02
मनसे : 01
माकप : 01
जनसुराज्य शक्ती : 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष : 01
शेकाप : 01
रासप : 01
स्वाभिमानी : 01
अपक्ष : 13
एकूण : 288 


(Maharashtra Vidhansabha MLA List 2019)


महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)


महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी