वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी, अमित देशमुखांची राज्यपालांशी चर्चा

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी 2020 परीक्षा कोविड-19 च्या लॉकडाऊनमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे, असे अमित देशमुख यांनी सांगितले.

Continues below advertisement

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखेच्या एम.डी, एम. एस.पदव्युत्तर दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, परिचर्या व तत्सम तसेच सर्व पदवी विद्याशाखांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठा कडून परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

येत्या 15 जुलैपासून वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र काही अनपेक्षित गोष्टी घडल्यास याबाबत परिस्थिती पाहून त्या-त्या वेळी निर्णय घेण्यात येतील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निश्चित केले जाईल, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. 15 जुलैपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची विद्यार्थ्यांनी तयारी करावी, असं आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola