Ambedkar Jayanti Wishes 2025 : क्रांतीसूर्य, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Ambedkar Jayanti) यांची जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. बाबासाहेबांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी करतात. 1891 साली या दिवशी बाबासाहेबांचा जन्म झाला. त्यांच्या स्मरनार्थ तुम्हीही काही शुभेच्छा संदेश तुमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना पाठवू शकता. 

Continues below advertisement


आंबेडकर जयंती शुभेच्छा संदेश 2025 (Ambedkar Jayanti Wishes In Marathi)


भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||


 


नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


 


राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||



निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा...!
|| जय भीम ||


 


मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची...
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!



ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान...
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने…
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


 


जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!



बाबांच्या लेखणीने लिहिलं भविष्य आमचं, 
दिशा दिली अन्यायाविरोधात चालण्याचं, 
वेळ  बदलेल, काळही बदलेल
पण जय भीमचा नारा कायम गगनात घुमेल...
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!



बाबासाहेबांनी दिलं आम्हाला विचारांचं बळ,
अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं अढळ धैर्य,
जगाला सांगितलं आम्हीही आहोत समान, 
स्वाभिमानाने जगायला दिला आत्मसन्मान...!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!



आजचा दिवस आहे गौरवाचा, 
उगवला एक तेजस्वी सूर्य समाजहितासाठी लढणारा, 
ज्याने दिला संविधानाचा अनमोल वारसा, 
देशाला दिला नव्या भविष्याचा आधारसा...
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!


हेही वाचा:                       


Ketu Gochar 2025 : मे महिन्यात धनवान होतील 'या' 3 राशी, पुढचे दीड वर्ष श्रीमंतीत जगाल, केतू देणार अपार धनलाभ