मुंबई : राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या पोटनिवडणुकींची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये अहमदनगरच्या श्रीगोंदा नगरपरिषदेत भाजपने विजय मिळवला. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला. तर साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. आपला गड राखण्यात चव्हाणांना यश मिळाले आहे.

रायगडमधील कर्जत नगरपालिकेवर शिवसेना-भाजप युतीने भगवा फडकवला आहे. तर 17 पैकी 11 जागा जिंकत भाजपने नागपूरमधील महादुला नगरपंचायत निवडणूक जिंकली. गडचिरोलीतील आरमोरी नगरपरिषदेवर 17 पैकी 8 जागा जिंकत भाजपेन आपला झेंडा फडकवला. दुसऱ्या बाजूला बीड नगरपालिकेतील पोटनिवडणूक राष्ट्रवादीने जिंकली. तर सोलापुरातील दुधनी नगरपरिषदेतील पोटनिवडणूक काँग्रेसने जिंकली आहे.
गडचिरोलीमधील आरमोरी नगरपरिषद निकाल


एकूण जागा 17 : भाजप विजयी

भाजप : 8

काँग्रेस : 6

परिवर्तन : 1

शिवसेना : 1

भाकप : 1

नगराध्यक्ष : पवन नारनवरे (भाजप)

========

अहमदनगरमधील श्रीगोंदा नगर परिषद


एकूण जागा 19 : भाजप विजयी

भाजप : 11

काँगेस-राष्ट्रवादी आघाडी : 8

नगराध्यक्ष : शुभांगी पोटे (काँगेस-राष्ट्रवादी आघाडी)

========

साताऱ्यातील मलकापूर नगरपरिषद

एकूण जागा 19 : काँग्रेस विजयी
काँग्रेस : 14
भाजप : 5
नगराध्याक्ष : नीलम येडगे (काँग्रेस)
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक काँग्रेसने जिंकली
========
रायगडमधील कर्जत नगरपालिका
एकूण जागा 17 : शिवसेना-भाजप युती विजयी
शिवसेना-भाजप-आरपीआय युती : 10 जागा
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी : 8 जागा
नगराध्यक्ष : सुवर्णा जोशी (शिवसेना)
========
नागपूरमधील महादुला नगरपंचायत
एकुण जागा 17 : भाजप विजयी
भाजप : 11
काँग्रेस : 4
बसप : 1
अपक्ष : 1
नगराध्यक्ष : राजेश रंगारी (भाजप)
========
बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 11 ची पोटनिवडणूक
राष्ट्रवादीच्या मोमीन खमरुनिस्सा शरीफोद्दीन विजयी
========
सोलापूरच्या अक्कलकोटमधील दुधनी नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या गुरुशांतप्पा श्रीमंतप्पा परमशेट्टी 432 मतांनी विजयी
========