Lata Mangeshkar :

  लतादीदींच्या (Lata Mangeshkar) रूपाने स्वर्गीय सूर निमाला आणि त्यांची स्वर्गीय यात्रा सुरु झाली असताना त्यांच्या स्वभावाचे अनेक अपिरिचित पैलू जगासमोर येऊ लागले आहेत. पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील मुंढेवाडी गावाचा सर्वसामान्य शेतकरी तरुण काही वर्षात त्यांच्या घरातील सदस्य बनला होता. मुंढेवाडी येथील शेतकरी  कुटुंबाचा तरुण अक्षय मोरे (Akshay More) हा दीदींच्या गाण्यावर निस्सीम प्रेम करायचा. यासाठी 2004 साली त्याने थेट सायकलवरून मुंबईला प्रभुकुंज येथे पोचला होता मात्र त्याला भेट न मिळाल्याने त्याने तेथील माती कपाळाला लावून परत आला होता. यानंतर देखील तो प्रभुकुंज वर जात राहिला. 


अखेर दीदींचे स्वीय सहायक महेश राठोड यांनी या तरुणाची माहिती दीदींना दिली आणि मग दीदींनी त्याला भेटायला बोलावले . फक्त  मिनिटाची वेळ मिळाली होती , अक्षय याने जाऊन थेट दीदींच्या पायाशी बसला मग दीदींनी त्याची चौकशी सुरु केली. काय करतो म्हणल्यावर अक्षयने आपण शेतकरी असून गुरे राखतो म्हणताच दीदींना त्याच्या प्रामाणिक उत्तरावर हसू आले आणि त्या मनापासून हसल्या . येथूनच दीदी आणि अक्षय यांचे ऋणानुबंध वाढू लागले . पहिल्या भेटीत दीदींनी त्याला देशी गाईचे तूप आणणार का असे विचारल्यावर पुढच्या वेळी अक्षय देशी गाईचे तूप घेऊन गेला . त्यावेळी दीदींनी त्याला विठ्ठलाची मूर्ती आणायला सांगितल्यावर मोठी पितळी विठूरायाची सुबक मूर्ती अक्षयने दीदींना दिली. नंतर अक्षय घरी जात राहिला कधी तूप घेऊन कधी काय पण त्यावेळी त्याला घरात थेट प्रवेश मऊ लागला होता . प्रत्येक वेळी दीदींनी त्याला काही ना काही भेट वस्तू दिल्या . यात अक्षय त्याची पत्नी आणि मुलीला कपडे दिले तर कधी त्यांच्या आवाजातील पाच हजार गाण्याचे कलेशन दिले. अगदी त्यांचा जवळच्या मंडळींचा असणाऱ्या लता मंगेशकर फॅन क्लब ऑफ इंडिया या व्हाट्स अप ग्रुपवर देखील अक्षयला अॅड केले होते . ज्या ज्या वेळी प्रभुकुंज वर गेलो तेंव्हा कधीही मला न जेवता दीदींनी सोडले नसल्याचे अक्षय भावुक होऊन सांगतो.  कोणत्याही स्वार्थाशिवाय निस्सीम प्रेम करणाऱ्या या शेतकऱ्याच्या पोराला दीदींनी अलोट प्रेम दिले. अगदी त्यांची एक भेट वस्तू अक्कलकोट येथील जन्मेजय भोसले याना देण्यासाठी दिंडीदनी अक्षयच्या हातातून पाठवली होती. दीदी गेल्याचे समजताच काळापासून अक्षय टीव्ही समोरून उठलाच नाही. 


पहिल्या भेटीत त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळे दीदींनी अक्षयचे सोबत काढलेल्या फोटोवर शुभकामना लिहून स्वाक्षरीसह त्याच्या मुढेवाडी येथील पत्त्यावर पाठविल्या होत्या . लतादीदी या जागतिक पातळीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होत्या मात्र  पंढरपूर तालुक्यातील एका छोट्याश्या गावात राहणाऱ्या  सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला देखील त्यांनी अलोट प्रेम दिले . यावरून त्या माणूस म्हणून किती मोठ्या होत्या आणि त्यांचे काळ्या मातीशी नाते  किती घट्ट होते हे  दाखवणारा त्यांच्या स्वभावाचा अनोखा पैलू त्यांचे मोठेपण अजून मोठे करणारा आहे.


संबंधित इतर बातम्या


 Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


Urmila Matondkar : शाहरूख थुंकला नाहीच, ट्रोल करणाऱ्यांना भान नाही; उर्मिला मातोंडकरांचा संताप


Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha