सातारा : अभिनेता अक्षय कुमारने आज साताऱ्यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि महिला पोलिसांशी मुक्त संवाद साधला. युथ पार्लिमेंट या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अक्षय कुमार साताऱ्यात आला होता.

मुलींनी समाजात वावरताना काळजी घेण्याचा सल्लाही अक्षय कुमारने यावेळी दिला. मासिक पाळी, मुलींची होणारी छेडछाड या विषयांनाही त्याने हात घातला. कार्यक्रमावेळी उपस्थित मुलींनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्याने मनमोकळी उत्तरे दिली.

महत्त्वाची बाब म्हणजे अक्षय कुमारने आपल्या बोलण्याची सुरुवात मराठीतून केली. यावेळी आपण मराठी भाषा कशी शिकलो याचा किस्साही त्यानं सांगितला.

आपण मराठी शिकलो त्याच कारण पोलिस असल्याचंही अक्षय म्हणाला. “मला मोटरसायकल चालवताना पोलिसांनी पकडले आणि मराठी बोलायला शिकण्यासाठी प्रवृत्त केलं, म्हणून मी मराठी शिकलो असं अक्षय कुमार म्हणाला.