Ajit Pawar: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार (Ajit Pawar) राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) ‘जनसन्मान यात्रा’ करणार आहेत. गुरुवारपासून त्यांची  ‘जनसन्मान यात्रा’ सुरू होत आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जाणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) 24 दिवसांमध्ये 39 विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरे करून ते सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला. आता आगामी विधानसभेत तरी आपली जादू चालावी यासाठी सुरू केलं आहे.


अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा टिझर जारी


अजित पवारांची जनसन्मान यात्रेचा टिझर जारी करण्यात आला आहे. यामध्ये 'सन्मान की बदले जान भी दे तो नही है घाटा रे!' हे गाणं लावण्यात आले आहे. त्यामध्ये अजित पवारांनी आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही जो वादा करतो तो पुराच करतो. या यात्रेच्या माध्यमातून सन्मान, संवाद, सशक्तिकरण हे मुद्दे डोळ्यासमोर असतील असा उल्लेख करण्यात आला आहे.




 


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, त्यापूर्वीच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील निवडणूक प्रचाराची तयारी केली आहे. अजित पवार 8 ऑगस्टपासून नाशिकमधून जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात उतरणार आहेत. 8 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार (Ajit Pawar) सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा आणि बैठका घेणार आहेत. याद्वारे शासकीय योजनांचीही माहिती दिली जाणार आहे. जन सन्मान यात्रा महाराष्ट्र-उत्तर, विदर्भ, पश्चिम या भागात 31 ऑगस्टपर्यंत काढण्यात येणार आहे. 22 ऑगस्ट रोजी मुंबईत जन सन्मान यात्रा होणार आहे.


महायुतीत लवकरच जागावाटप होऊ शकते 


महायुती विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला 15 ऑगस्टपर्यंत ठरवू शकते, अशीही चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, फॉर्म्युल्या अंतर्गत ज्या जागांवर पक्षांचे आमदार विजयी झाले आहेत, त्या जागांसाठी सिटिंग-गेटिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जिथे जिथे पक्षांचे आमदार निवडून आले आहेत तिथे त्या पक्षांचेच उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे.