पुणे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये झाडं वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी 'एकच वादा अजितदादा' अशी घोषणाबाजी केली. त्यानंतर अजित पवारांनी या कार्यकर्त्यांची फिरकी घेतली. हा वादा लोकसभेला कुठे गेला होता काय माहिती, असं अजित पवार म्हणाले आणि एकच हशा पिकला. अजित पवारांनी मिश्किल शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांनी स्टेजवरून केलेल्या फटकेबाजीवर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. 


उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर अजित पवार यांचे निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी येथे अजित पवार यांचा जनता दरबार घेतला. या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 65 व्या वाढदिवसानिमित्त बारामतीत एक कुटुंब एक झाड संकल्पना राबवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या झाडांचे वाटप करण्यात आले. अजित पवारांनी प्रातिनिधिक स्वरूपात रोपाचे वाटप केले. 


योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो, अजित पवारांचा टोला


अजित पवार म्हणाले, मी नेहमी सांगत असतो जे होईल ते नियमाने झालं पाहिजे. प्रांत अधिकारी यांच्याकडे घेऊन जा आणि यांचे काम आहे ते बघा... पूर्वी पाटकरी आणि भाऊसाहेब यांचा रुबाब असायचा. पूर्वी जिल्हाधिकारी आणि प्रांत यांना जास्त ओळखत नव्हते. मी शब्दाचा पक्का आहे. योजना आणताना आम्ही विचारपूर्वक आणतो. त्यामुळे विरोधकांना ते आवडलं नाही, त्यामुळे विरोधक बोलत आहेत.


कोणालाही उधार देऊ नका : अजित पवार


वीज बिल माफ केलं आहे, आता आकडे टाकू नका . किंमत मापात ठेवली तर लोकं येतील. उधार कुणाला देऊ नको माझ्या वस्तीवरचे कुणी आले तरी  उधार देऊ नको. त्याला सांग दादाने संगितले आहे की, उधार देऊ नका. आज रोख उद्या उधार असा बोर्ड लाव, असे अजित पवार म्हणाले.  




हे ही वाचा :


Pune Heavy Rain: पुण्यात पुन्हा पूरस्थिती; खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना