मुंबई : कोर्टाची पायरी कुणामुळे चढावी लागली असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रवादी शरद पवारांचा (Sharad Pawar) रोख अजित पवारांकडे (Ajit Pawar) होता. तसंच मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जावं लागलं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती. माझा व्हिजन कार्यक्रमात अजित पवारांनी दोघांनाही प्रत्युत्तर दिलंय. मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची गरज काय होती? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी हे कोर्टात गेले का असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले, सुप्रिया नेहमी सांगते माझ्या मुलीचा वाढदिवस होता तरी मला कोर्टात जावे लागले.पण वाढदिवस करायचा कोर्टात कशाला गेली? त्यादिवशी कोर्टात नव्हते जायचे किंवा वकिलाला सांगायचे माझ्या मुलीचा वाढदिवस आहे पुढची तारीख दे...हे भावनिक करणे चांगले नाही.. रेवती पण माझी मुलगी आहे पण माझ्या मुलीचा वाढदिवस होता तिथे बसले तिथे तिला यायला सांगितले, असे नका करू, ठीक आहे माझी मत वेगळी तुमची मत वेगळी... मी कोणालाचा कोर्टात जायला सांगितले नाही मी स्वत कोर्टाची पायरी चढली नाही. मी वकिलाला पैसे देतो त्याने माझी बाजू मांडली पाहिजे.
आपण कोर्टात जाऊन काय करणार?
निवडणूक आयोगाकडे आम्ही पक्ष आणि पक्षचिन्हासाठी गेलो. उद्या आम्ही कोर्टात गेलो, आपण कोर्टात जाऊन काय करणार? कोर्टात तुमच्यावतीने वकील भांडणार, आपण फक्त हा वकील काय बोलतो? तो वकील काय बोलतो, कोर्ट काय बोलतो ते बघणार. आपल्याला तिथे काय अधिकार आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी कोर्टात गेलात का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
सुप्रिया सुळेंनी काय पोस्ट केली?
सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील सर्वोच्च न्यायालयात आली होती. यावेळी सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी मुलगी रेवतीचा आज वाढदिवस आहे. नेमकी आजच सुप्रीम कोर्टाची सुनावणी होती. ती देखील आज माझ्यासोबत कोर्टात आली आहे. आम्ही मुली खंबीरपणे उभा राहून संघर्ष करीत आहोत.आम्ही सर्वजणी लढणाऱ्या मुली आहोत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. हॅपी बर्थडे रेवती.
हे ही वाचा :