कल्याण: उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP)  गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad)  यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच  गोळीबार  झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी  प्रतिक्रिया  अजित पवारांनी (Ajit Pawar)  दिली आहे. 


अजित पवार म्हणाले,  उल्हासनगरमध्ये झालेली घटना आपण पाहिली असून वैतागलेल्या माणसासारखा तो बोलत होता.  संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याची खबरदारी लोकप्रतिनिधींनी घेतली पाहिजे. मात्र त्यांच्या बोलण्यात फार वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या.  रात्री उशिरा त्याबाबत आपल्याला माहिती मिळाली वास्तविक कुणीही अशा पद्धतीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. सगळ्यांना नियम आणि कायदे हे सारखेच असतात कुणाच्याबद्दल माझी काही तक्रार असेल तर मी ती पोलीस स्टेशनला देईल संबंधित घटनेबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत.  याबाबत आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. 


वैद्यकीय चाचणीसाठी नेताना आरोपी गायकवाड हसत पोलिस स्टेशनबाहेर


विशेष म्हणजे अटकेनंतर वैद्यकीय चाचणीसाठी नेताना आरोपी गायकवाड हसत पोलिस स्टेशनबाहेर आला आहे. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत. कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर  मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे...  पोलिसांनी आरोपी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आलंय....


वादाचा अंत उल्हासनगरच्या पोलीस स्टेशनमध्ये


गणपत गायकवाड यांनी वेळोवेळी त्यांचा आमदार निधी हा वापरला जात नाही जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे असे आरोप प्रत्यारोप अनेक वेळा त्यांनी केले आहेत.  त्यामुळे आमदार गणपत गायकवाड नाराज होते. तीन दिवसांपासून गणपत गायकवाड यांचा कल्याणमध्ये कधी उद्घाटनावरून तर कधी जमिनीवरून वाद सुरू आहे आणि या वादाचा अखेर अंत काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पाहायला मिळाला. 


हे ही वाचा :


वाद मिटवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं; रागाच्या भरात पोलीस ठाण्यातच घडला थरार; गणपत आणि महेश गायकवडांमध्ये रात्री नेमकं काय झालं?