Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : नवीन आलेल्यांना मान सन्मान देऊ, पण जुन्या नेत्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. आपला पक्ष सर्व जाती धर्माचा आहे. लाडक्या बहिणी आणि वीज माफीची योजना आम्ही बंद केली नाही. पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. माझी थोडी तारांबळ होतेय, पण मी मार्ग काढतोय. 2100 रुपये कधी द्यायचं याचा निर्णय मी योग्य वेळी घेईन असेही अजित पवार म्हणाले.
इचलकरंजीच्या पाण्याबाबत मार्ग कसा काढायचा ते ठरवणार असल्याचेही अजित पवार म्हणाले. इचलकरंजी महापालिका जीएसटी मुद्दा अजून आहे तो सोडवला जाईल. आज प्रवेश केलेले आपलेच होते, मध्यंतरी कोण इकडे कोण तिकडे असं झालं असेही अजित पवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे किती वेळ उपस्थित होते? कुठलाही प्रश्न त्यांनी मांडला नाहीत असेही अजित पवार म्हणाले.