नव्या 36 मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप, अजित पवारांना देवगिरी तर अशोक चव्हाणांना मेघदूत

महाराष्ट्र शासनाने आज परिपत्रक काढून नव्या 36 कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरेंना विधान भवनासमोरील अ-6 बंगला देण्यात आला आहे.

Continues below advertisement

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचं खातेवाटप रखडलं असलं तरी मंत्र्यांच्या बंगल्याचं वाटप झालं आहे. अजित पवारांना त्यांचा फेव्हरिट देवगिरी, अशोक चव्हाणांना मेघदूत, दिलीप वळसे पाटलांना शिवगिरी तर अनिल देशमुखांना ज्ञानेश्वरी बंगला मिळाला आहे.

Continues below advertisement

राज्य शासनाने आज परिपत्रक काढून नव्या 36 कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना बंगल्यांचे वाटप केले आहे. कॅबिनेट मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरेंना विधान भवनासमोरील अ-6 बंगला देण्यात आला आहे.

कुठल्या मंत्र्याला कोणता बंगला

कॅबिनेट मंत्री 1. अजित पवार - देवगिरी 2. दिलीप वळसे पाटील - शिवगिरी 3. अशोक चव्हाण - मेघदूत 4. अनिल देशमुख - ज्ञानेश्वरी 5. आदित्य ठाकरे - अ 6 6. धनंजय मुंडे - अ 9 7. विजय वडेट्टीवार - अ 3 8. वर्षा गायकवाड - ब ४ 9. जितेंद्र आव्हाड - ब 1 10. हसन मुश्रीफ - ब 5 11. अनिल परब - क 5 12. सुनील केदार - ब 7 13. अमित देशमुख - अ 4 14. नवाब मलिक - अ 5 15. उदय सामंत - ब 2 16. दादाजी भुसे - ब 3 17. संजय राठोड - क 1 18. गुलाबराव पाटील - क 8 19. के. सी पाडवी - क 3 20. संदीपान भुमरे - क 4 21. बाळासाहेब पाटील - क 6 22. अस्लम शेख - क 2 23. यशोमती ठाकूर - ब 6 24. शंकरराव गडाख - सुरुची 16

राज्यमंत्री 1. बच्चू कडू - रॉकीहील टॉवर 1202 2. संजय बनसोडे - रॉकीहील टॉवर 1203 3. शंभुराज देसाई - यशोधन 12 4. अब्दुल सत्तार - सुरुची 15 5. सतेज पाटील - सुरुची 3 6. राजेंद्र यड्रावकर पाटील - सुरुची 2 7. दत्तात्रय भरणे - अवंती 1 8. आदिती तटकरे - सुनिती 10 9. विश्वजीत कदम - निलांबरी 302 10. प्राजक्त तनपुरे - निलांबरी 402

मंत्रिमंडळातील कुठल्या नेत्यांना कुठला बंगला? | ABP Majha

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola