Ajay Baraskar on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण मिळावं यासंदर्भात आमची भूमिका असून जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षण मिळालं. मात्र, त्यांच्या अंतर्गत दुर्गुणामुळे मराठा आरक्षणाला तडा गेला, अशी टीका अजय बारसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली. बारसकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढत असल्याचे म्हटले आहे. 


सदावर्ते हे मराठा द्वेषी आहेत 


ते म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात देखील आम्ही लढलो आहे. त्यांचं म्हणणं आहे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो. मात्र, त्यांना कोणी वकीलपत्र दिलेलं नाही. एकीकडे गुणरत्न सदावर्ते आणि दुसरीकडे कोटी मराठे आहेत. गुणरत्न सदावर्तेंविरेधातील लढाई आम्ही सुरु ठेवणार आहे. सदावर्ते हे मराठा द्वेषी आहेत काहीही प्रश्न आला की खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो असं म्हणतात. त्यांना कोणी वकीलपत्र दिली आहे का? एकट्या माणसाने आरक्षण रद्द केलं आहे, आरक्षणाचं रक्षण केलं पाहिजे होतं. कायदेशीर मुद्यांवर आपण लढले पाहिजे.  आमची हयात फडणवीस यांच्याविरोधात गेली मग आम्ही सरकारचा माणूस कसा? मी मराठा समाजाचा माणूस आहे, अशात मला जीवे मारण्याची धमकी दिली तरी जनजागृती मी करणार आहे, असेही ते म्हणाले. 


मग आम्ही सरकारचा माणूस कसा? 


बारसकर म्हणाले की, जितका खर्च आम्ही कायदेतज्ज्ञांवर खर्च केला नाही, तितका खर्च फुलांवर आणि जेसीबीवर झाला. ते पुढे म्हणाले की, सगेसोयरेंचा ड्राफ्ट करताना मी तिथे होतो. सगेसोयरेचं श्रेय मनोज जरांगे यांचे आहे. त्यांनीच सरकारचा तो ड्राफ्ट तयार केला आहे. सगेसोयरेंचा ड्राफ्ट मनोज जरांगेंच्या डोक्यातील आहे, ही चांगली मागणी आहे. मसुद्याच्या प्रक्रियेत मी होतो, जरांगेंनी जसं सांगितलं तसा ड्राफ्ट तयार करण्यात आला होता, तोच ड्राफ्ट वाशीत स्वीकारला होता, असेही त्यांनी सांगितले. 


सगेसोयरे संदर्भातील प्रश्न संपवला पाहिजे


रागात आणि नाराजीत सत्य कळत नाही, माझी कळकळ मराठा समाजाला कळेल. सरकारला कायद्याने राज्य चालवावं लागतं. अशात यांनी जे शब्द सांगितले ते शब्द सरकारनं ड्राफ्टमध्ये टाकले होते. सरकार मराठा समाजासमोर झुकलं होतं जरांगेंसमोर झुकलं नव्हतं. सरकारनं शीघ्रगतीनं काम करावं आणि सगेसोयरे संदर्भातील प्रश्न संपवला पाहिजे, असे ते म्हणाले. 


किती जणांनी दाखले घेतले हे सरकारनं जाहीर करावं


छत्रपतींसमोर सरकारनं शपथ घेतली होती, त्यामुळे त्यांनी सगेसोयऱ्यांचा ड्राफ्ट अंमलात आणावा. आमच्या हातात काय आलं? हा देखील प्रश्न आहे. मनोज जरांगेंकजून दावा केला जातो दीड कोटी जणांना आरक्षण मिळालं. मात्र, 40-45 हजार लोकांच्या नोंदी सापडल्या आहेत. यामधील काही जणांनी आधीच लाभ घेतलेला आहे. 24 डिसेंबरपासून किती जणांनी दाखले घेतले हे सरकारनं जाहीर करावं. जेवढं मिळायला पाहिजे होतं, त्यापेक्षा जास्त आमचं नुकसान झालं. जातीजातीत विद्वेष तयार झाला, ओबीसी-मराठा वाद सुरु झाला, लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं असं जरांगे बोलले, ते कसं पुसणार? असे बारसकर म्हणाले. 


सगेसोयरेचा ड्राफ्ट स्वीकारल्यानंतर तो लागू करावा आणि त्यासंदर्भात कोणी आवाहन दिलं तर त्याची जबाबदारी जरांगे यांच्या अभ्यासकांची आणि जरांगे यांची आहे. गणगोत, सगेसोयरे काय घाला ते सर्व घातलं आहे. सरकारनं सरकारचं काम केलं आहे, आता जरांगेंची जबाबदारी आहे ते टिकवले पाहिजे. सगळं श्रेय जरांगेंना यासंदर्भात जातं.सगेसोयरे संदर्भातील हरकती तपासाव्यात आणि तो ड्राफ्ट अंमलात आणाव, सगेसोयरेंचा ड्राफ्ट आता कोर्टात टिकवण्याची जबाबदारी जरांगेंची असल्याचे ते म्हणाले. 


 इतर महत्वाच्या बातम्या