अहमदनगर : जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रमातून मिळणारं यश किती मोठं असतं याचं उदाहरण जिल्ह्यातील छोटसं गाव असलेल्या मढे वडगाव येथील शिंदे कुटुंबातील मुलांनी दाखवून दिले आहे. एकाच घरातील 2 भावांनी MPSC परीक्षेत यश मिळवत उपजिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार या पदावर आपले नाव कोरले आहे. सामान्य शेतकरी घरातील मुलांना मिळालेलं हे नेत्रदीपक यश सध्या गावसह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय.
अहमदनगर पासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील वडगाव हे छोटसं गाव. गावात जिल्हा परिषदेची शाळा, फारशा शिक्षणाच्या आधुनिक सुविधा या गावात नाहीत. असं असलं तरी दत्तात्रय शिंदे या शेतकऱ्याच्या 2 मुलांनी MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होत घवघवीत यश मिळवळय.
एक उपजिल्हाधिकारी तर एक नायब तहसीलदार
अजय शिंदे हा उपजिल्हाधिकारी पदावर तर नरेंद्रची नायब तहसीलदार पदावर निवड झालीय. दत्तात्रय शिंदे यांची परिस्थिती नसताना शेतात कष्ट करून मुलांच्या शिक्षणाचा खर्च केला. दोन्ही मुलांनी MPSC परीक्षेत यश मिळवलं. अजय याला हे यश चौथ्या प्रयत्नात मिळाले असून नरेंद्र हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला. अजयला अपयश आल्यानंतर पुन्हा स्पर्धा परीक्षेची अभ्यास करणं हे मोठं आव्हान होत. मात्र, जिद्द, सातत्य आणि मेहनत यांच्या जोरावर त्याने स्पर्धा परीक्षेत यश खेचून आणलं. तर मोठ्या भावाने केलेल्या चूक आपल्याकडून होऊ नये. याची खबरदारी घेत नरेंद्र शिंदे याने देखील पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.
मराठा आरक्षणामुळे मराठा समाजातील 127 तरुण झाले अधिकारी
हलाखिच्या परिस्थितीत मिळवलं यश
मुलांच्यात गुणवत्ता लहानपणापासूनच असल्यामुळे ते स्पर्धा परीक्षेत यश मिळवतील असा विश्वास अजय आणि नरेंद्रच्या आई-वडिलांना होता. त्यामुळे परिस्थिती नसतानाही खर्चाचे नियोजन करून त्यांच्या शिक्षणासाठी पैसा पुरवला. आता त्यांना मिळालेल्या यशामुळे आपल्या श्रमाच चीज झाल्याची भावना शिंदे दाम्पत्यांनी व्यक्त केली. राज्यातील लाखो मुले स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. स्पर्धा परीक्षेत अभ्यास करताना सातत्य आणि मेहनत याची सांगड असल्याशिवाय यश मिळण कठीण आहे. मात्र, जिद्दीने अभ्यास करून एकाच घरातील अजय आणि नरेंद्र या 2 भावंडांनी मिळवलेलं यश हे निश्चितच नेत्रदीपकच म्हणावे लागेल.
MPSC Results | MPSCचा निकाल जाहीर, सातारचा प्रसाद चौगुले अव्वल, रविंद्र शेळके राज्यात दुसरा