सिंधुदुर्ग : राज्य सरकारने अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परिक्षा अखेर रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन आता पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी बॅकलॉग व एटीकेटीच्या 3 लाख 41 हजार 308 विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले का? असा प्रश्न विचारत राज्यातील विद्यार्थ्यांचा एकत्रित एकसुत्री निर्णय नसून हे शैक्षणिक आरोग्य बिघडवण्याचे पाप असल्याचा आरोप केलाय. तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असे म्हणत उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलंय.
राज्य सरकारने व्यवसायिक अभ्यासक्रम, बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम हा पहिला टप्पा आणि एटीकेटीचा दुसरा टप्पा अशा दोन टप्प्यात निर्णय घेतले आहेत. व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा न घेण्याचा निर्णय राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये झालेला आहे. त्याला मान्यता अभ्यास बॉडीने द्यावा असा निर्णय घेतला आहे. बिगर व्यवसायिक अभ्यासक्रम परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यांना पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मार्क वाढवायचे असल्यास त्यांनी पुन्हा एकदा परीक्षा द्यावा, असे स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सामंत यांनी सांगितले.
राज्यातील 3 लाख 41 हजार 308 एटीकेटी आणि बॅकलॉकच्या विद्यार्थ्यांबाबतीत स्पष्ट धोरण आहे. सगळ्या कुलगुरूंशी येत्या दोन-तीन दिवस मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करून निर्णय जाहीर करू, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
बॅकलॉग व ATKT च्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले? विद्यार्थ्यांसोबत ही तर 'हेराफेरी' : आशिष शेलार
मुख्यमंत्र्यांनी सरासरी गुणांवर ठरवू अशी, घोषणा केली होती. आता त्यातून माघार घेऊन "योग्य सूत्र" विद्यापीठांनी ठरवा सांगून गोंधळ वाढवला, असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यावर याबाबत गेले पाच वर्षे विरोधक सत्तेत असताना त्यांना विद्यार्थ्यांची काळजी वाटली नाही का? विद्यार्थ्यांच्या विषयी केव्हा ते बोलले नाहीत. दुर्दैवाने जे जे निर्णय घेतले त्यातील 65 जी आर मागे घेतले. आम्ही कुठलाही जी आर अजून मागे घेतलेला नाही. मागे घेण्याचा प्रश्न येत नाही. मुख्यमंत्री विद्यार्थ्यांकडे सक्षम व काळजी पोटी बघतायेत. त्याची प्रचिती पालकांना आणि विद्यार्थ्यांना आलेली असल्याचे ते म्हणाले.
विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर द्यायला बंधनकारक समजत नाही : सामंत
कृषी विद्यापीठांनी 'आपापले' वेगळे सूत्र ठरवले तर राज्यातल्या राज्यात गोंधळ निर्माण होईल, असाही विरोधकांचा आरोप आहे. विरोधक विद्यार्थ्यांमध्ये नाहक संभ्रम निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतायेत. विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणे मी मंत्री म्हणून बंधनकारक समजत नाही. विरोधकांनी टीका करत रहावी, आम्ही आमचं काम करत राहू, असे उत्तर शिक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या प्रश्नाला दिले.
म्हणून विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठलाय
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यापेक्षा विद्यार्थ्यांची आम्हाला काळजी आहे. हेच विद्यार्थी भविष्यामध्ये धडा शिकवतील. प्रतिज्ञापत्रात असा कुठेही उल्लेख नाही. त्यांना भिंगाच्या चष्म्यातून व्यवस्थित वाचायला सांगा. लेखी स्वरूपाने कळवावे, असे आहे. अनेक असे सोर्स आपल्याकडे आहेत त्यातून लेखी विद्यार्थी विद्यापीठांना कळवू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय झालाय. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय झाल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे, असेही सामंत म्हणाले.
Maharashtra Exam | राज्यपालांचा विरोध असतानाही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द