बीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील नाराजी नाट्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना वेगवेगळ्या माध्यमाद्वारे संघटना टिकली पाहिजे याचा आग्रह धरला आहे. स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी रक्ताने पत्र लिहून राजू शेट्टी यांच्याकडे आमदारकी स्वीकारण्याचे मागणी केली आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

हे पत्र रक्ताने यासाठी लिहिलं कारण शेतकऱ्यांसाठी रक्त सांडणाचा तुमचा विचार जिवंत राहिला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही चळवळ टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे, पूजा मोरे यांनी आपल्या पत्रातून मागणी केली आहे.

पुढे पत्रात पूजा मोरे म्हणतात.. साहेब, आपल्या आमदारकीवरुन महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा चालू आहेत. या काळात तुम्हाला फोन करण्याची माझी हिंमत झाली नाही. आपण आमदारकी स्वीकारावी, ही पदाधिकारी म्हणून माझी इच्छा आहेच. पण, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचीदेखील हीच इच्छा आहे.

Continues below advertisement

'स्वाभिमानी'तला वाद मिटला, राजू शेट्टी विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार

या भावना आपण लक्षात घेऊन आपला आवाज विधानसभेत पोचावा, ही आमची इच्छा आहे. पद असो अथवा नसो, मी आपल्याला सोबत कायम आहे, फक्त तुम्ही ढासळू नका. सेनापतीच ढासळला तर आमचं अर्ध अवसान गळून पडतंय. आपण लढू साहेब.

राजू शेट्टी यांच्या आमदारकीला विरोध करणाऱ्या नेत्यांना त्यांनी, "फक्त एका आमदारकीसाठी राजीनामे देणारे आपण नाहीत. आपल्या राजीनाम्याने चळवळ फोडू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका. आपण अजून ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. आपल्याला साहेबांचा विचार सोडून जमणार नाही. त्यातच सर्व शेतकऱ्याचं हित आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना मधील वाद आता मिटले असले तरी कार्यकर्ते आपल्या भावना वेगळ्या माध्यमातून संघटने च्या नेतृत्वापर्यंत पोहचत आहेत. स्वाभीमानी संघटेनेतील अंतर्गत वाद मिटला असून राजू शेट्टी यांनी आमदारकी स्वाकारली आहे.

Raju Shetti | राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारणार - राजू शेट्टी