मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं निधन झालं. ते 71 वर्षांचे होते. एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच खेळ सुरू झाला तेव्हा काँग्रेस सरकारमध्ये सहभागी होणार का? हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यासाठीच्या वाटाघाटीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली ती अहमद पटेल यांनी.
दिल्लीत नितीन गडकरी यांनी अहमद पटेल यांनी भेट घेतल्यावर ही चर्चा जोरात सुरू झाली नेमकी काँग्रेस सरकारमध्ये येणार की नाही? पण काँग्रेस आमदारांच्या आग्रहाखातर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रात सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. सत्तेचं वाटप आणि सूत्र ठरवण्याची जबाबदारी अहमद पटेल यांच्यावर होती. त्यावेळी अहमद पटेल स्वतः मुंबईत आले होते. मुंबईत झालेल्या सर्व चर्चांमध्ये त्यांचा सहभाग होता. खाते वाटपामध्ये एकीकडे शरद पवार दुसरीकडे काँग्रेसकडून अहमद पटेल होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन; वयाच्या 71व्या वर्षी अखेरचा श्वास
राष्ट्रवादीत बंड झाले. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतल्यावर अहमद पटेल यांनी मुंबईतून सूत्र हलवली. त्यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना शरद पवार यांची भूमिका स्पष्ट सांगितली आणि त्यानंतर काँग्रेस शरद पवार यांच्या पाठीशी उभी असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.
महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क अहमद पटेल यांच्याच होता. राज्यात सरकारमध्ये काहीही कुरबुरी झाल्या तर मातोश्री आणि सिल्वर ओक वरून थेट अहमद पटेल यांना संपर्क केला जात होता. शरद पवार आणि अहमद पटेल तर दिल्लीपासून जुने सहकारी असल्यामुळे शरद पवार देखील एखादी गोष्ट करून घेण्यासाठी अहमद पटेल यांनाच फोन लावायचे.
अहमद पटेल यांच्या निधनानंतर राजकीय विश्वात शोक; मोदी-सोनियांसह अनेक दिग्गजांकडून श्रद्धांजली
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्याया सरकारचा access point अहमद पटेल होते. कोणतीही निवडणूक, जागा वाटप, उमेदवार निवड राज्यातील काँग्रेस नेत्यांना देखील अहमद पटेल हाच एक आधार होता. अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडी सरकारच्या नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार यांच्यातील समन्वयाचा धागा अहमद पटेल यांच्या रूपाने तुटला आहे.