देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. आरक्षण स्थगितीमुळे रखडलेले शैक्षणिक प्रवेश सुरु होणार, 9 सप्टेंबरनंतरच्या अर्जांसाठी आरक्षणाविना प्रवेश, त्यापूर्वीच्या अर्जांना खुल्या वर्गातून प्रवेश


2. कोरोना चाचणीचा अहवाल नेगेटिव्ह असेल तरच गुजरात, राजस्थान, गोवा, दिल्लीतून येणाऱ्यांना महाराष्ट्रात एन्ट्री; सीमेवर 'एपीबी माझा'चा रिअॅलिटी चेक


3. राज्यातील धान उत्पादकांना ठाकरे सरकारचा दिलासा; प्रति क्विंटलमागे शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस, 2 हजार 588 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळणार


4. कोरोनामुळे यंदा भक्तांविना पंढरीत कार्तिकी एकादशी; 'एबीपी माझा'वर घरबसल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून दर्शन


5. विनामास्क ग्राहकांना सामान दिल्यास 15 दिवस दुकानं बंद ठेवणार, कोरोना रोखण्यासाठी औरंगाबाद पालिकेचा निर्णय, मंगल कार्यालयांनाही नोटीस


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 25 नोव्हेंबर 2020 | बुधवार | ABP Majha



6. कितीही दबाव टाकला तरी आवाज बंद करू शकत नाही, प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत, विहंग सरनाईकांची आज पुन्हा चौकशी


7. कोरोना संकटात आंदोलनं करणाऱ्या राजकीय पक्षांना समज द्या, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तक्रार, टास्क फोर्सची स्थापना केल्याचीही माहिती


8. बँकांची कामं उरकण्यासाठी आजचा दिवस, उद्या बँक कर्मचाऱ्यांची लाक्षणिक संपाची हाक; शनिवार, रविवार, सोमवार सलग सुट्ट्या असल्यानं बँका बंद


9. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं कोरोनानं निधन, वयाच्या 71व्या वर्षी गुरुग्रामच्या वेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास; मुलगा फैजल पटेल यांची ट्विटरवरून माहिती


10. मुंबईतील साकीनाका परिसरात सिलेंडचा स्फोट; एकाच कुटुंबातील 6 जण जखमी तर 15 वर्षीय मुलीचा मृत्यू